मोरबे धरणात ५१ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

वाशी : नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या  नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणातील जलसाठा खालावल्याने  नवी मुंबई शहरात विभागवार आठवड्यातील तीन दिवस पाणी कपात सुरु आहे.  मोरबे धरण क्षेत्रात संपूर्ण जून महिन्यात फक्त ५०५ मी.मी. पावसाची  नोंद झाल्याने जलसाठ्यात अवघ्या १ टवक्यांनी वाढ झाली असून, ५१ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा मोरबे धरणात शिल्लक आहे. त्यामुळे मोरबे धरण क्षेत्रात मुबलक पाऊस न पडल्यास नवी मुंबई मधील नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडणार आहे.

नवी मुंबई शहराला मोरबे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मोरबे धरण १०० टवव्ोÀ भरण्यासाठी पाण्याने ८८ मीटर पातळी गाठल्यानंतर धरणात १९०.८९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा होतो. मोरबे धरणातून नवी मुंबई शहरवासीयांना प्रतिदिवस ४८८.९७ एमएलडी पाणीपुरवठा होतो. मोरबे धरणातून नवी मुंबई शहरासह कामोठे आणि मोरबे परिसरातील ७ गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यंदा नवी मुंबई महापालिकेचे पाण्याचे नियोजन पुरते फसले असून, मोरबे धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. मोरबे धरणातील पाणीसाठा आणि पावसाचा अंदाज पाहता मागील दोन-तीन वर्षांपासून नवी मुंबई शहरात एक दिवस पाणी कपात केली जात होती. मात्र, यंदा मे महिन्यातच पाणीसाठा खालावत गेल्याने मोरबे धरणात अवघा २८ टवव्ोÀ पाणीसाठा  शिल्लक राहिला आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने प्रथमतः एक वरुन दोन दिवस पाणी कपात केली. दोन दिवस पाणी कपातीच्या निर्णयाला अवघे चार दिवस उलटत नाही तोवर पाणी कपात १ जून पासून विभागवार आठवड्यातील तीन दिवस करण्यात आली. मोरबे धरण क्षेत्रात सरासरी ३३०० मी.मी. पावसाची नोंद होते.परंतु, यंदा जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने मोरबे धरणातील पाणीसाठा वाढला नाही. संपूर्ण जून महिन्यात अवघ्या ५०५ मी.मी.पावसाची नोंद झाली असून, मोरबे धरणात आता ५३.९३५ दशलक्ष घनमीटर म्हणजेच २८ टवव्ोÀ पाणी शिल्लक आहे. मोरबे धरणात आता फक्त ५१ दिवस पुरेल इतकाच  पाणीसाठा आहे. त्यामुळे जुलै महिन्यात मोरबे धरण क्षेत्रात मुबलक पाऊस पडला नाही तर नवी मुंबई शहरातील नागरिकांवरील पाणी कपातीचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मोरबे धरण क्षेत्रातील मागील तीन वर्षातील पाऊस
सन २०२१ - ४२२९ मी.मी.
सन २०२२ - ३५७१  मी.मी.
सन २०२३ - ३५४०  मी.मी.
३० जून २०२४ पर्यंत - ५०५ मी.मी.
---------------------------------------------
मोरबे धरणातील पाणीसाठा २७ टक्क्यांवर आल्याने नवी मुंबई शहरात पाणी कपात करण्यात आली होती. मात्र, संपूर्ण जून महिन्यात अवघा ५०५ मी.मी. पाऊस झाल्याने मोरबे धरणातील पाणीसाठ्यात अवघी एक टक्का वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी दोन आठवड्यात मोरबे धरण क्षेत्रात मुबलक पाऊस पडेल अशी आशा आहे. मोरबे धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला नाही तर पाणी पुरवठा बाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा करुन पुढील निर्णय घ्ोतला जाणार आहे. - वसंत पडघम, उप अभियंता - पाणी पुरवठा विभाग, नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 मालमत्ता कर भरण्यासाठी पनवेलकरांचा मोठा प्रतिसाद