उल्हासनगर महापालिका ॲवशन मोडवर

उल्हासनगर : १३ मे २०२४ रोजी घाटकोपर, मुंबई येथे जाहिरात फलक कोसळून झालेली दुर्घटना पाहता राज्यात अन्य ठिकाणी मान्सूनपूर्व कालावधीत तसेच मान्सून कालावधीत अशा दुर्घटना होऊन जीवितहानी होऊ नये म्हणून उल्हासनगर महापालिका प्रशासन देखील ॲवशन मोडवर आली आहे. त्यानुसार उल्हासनगर शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांवर महापालिकेच्या वतीने कारवाईला सुरुवात झाली आहे.

महापालिका क्षेत्रातील सर्व जाहिरात फलकांचे संरचनात्मक परीक्षण करण्यात यावे तसेच तपासणीअंती अवैध आणि धोकादायक असणारे जाहिरात फलक तातडीने निष्कासनाची कार्यवाही करुन संबंधितांविरोधात नियमानुसार कठोर कारवाई करणेसाठी आयुक्त अजीज शेख यांनी सर्व सहाय्यक आयुक्त, प्रभाग समिती यांना आदेश दिले होते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त (शहर) जमीर लेंगरेकर यांच्या निर्देशानुसार आणि उपआयुक्त किशोर गवस यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त, प्रभाग समिती यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील सर्व जाहिरात फलकांचे संरचनात्मक परीक्षण करण्यासाठी आणि बेकायदेशिर होर्डिंग हटविण्यासाठी एकुण ४७ नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.

त्याअनुषंगाने २१ मे पासून शहरातील अनधिकृत होर्डिंग विरुध्द प्रत्यक्ष कारवाईला सुरु करण्यात आली असून कल्याण-अंबरनाथ या मुख्य रस्त्यावर वेलकम गेट जवळ, शांतीनगर या ठिकाणी असलेले विनापरवानगी अनधिकृत होर्डीग कापून हटविण्यात आले आहे. दरम्यान, यापुढे देखील उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील विनापरवानगी अनधिकृत होडींग, जाहिरात फलकांवर दैनंदिन नियमितपणे महापालिका मार्फत धडक कारवाई सुरु ठेवण्याचे आदेश आयुक्त अजीज शेख यांनी सर्व सहायक आयुक्त, प्रभाग समिती यांना आदेश दिलेले आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

होल्डींग पॉन्डच्या सफाईत कांदळवनाचा अडसर कायम?