वाशी टोल नाक्यावर दुहेरी लूट 

नवी मुंबई: मनसेकडे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर  अंकिता वालावलकर उर्फ (Kokan Heart Girl) यांच्याकडून आलेल्या तक्रारीनुसार वाशी टोल नाक्यावर नागरिकांची आर्थिक फसवणूक होत आहे, असे निदर्शनास आले आहे. फास्ट टॅग तांत्रिक अडचणीमुळे स्कॅन होत नाही, हे कारण देत टोल कर्मचाऱ्यांकडून रोख रक्कम मागितली जाते. रोख पैसे दिल्यानंतर थोड्या वेळाने नागरिकांना त्यांच्या फास्ट टॅग खात्यामधून देखील पैसे घेतले गेल्याचे लक्षात येते. नागरीकांना यामुळे एका टोलसाठी दुप्पट भुर्दंड सोसावा लागत आहे.

हा सरळसरळ नागरीकांना लुटण्याचा प्रयत्न असल्याचा मनसेने थेट आरोप केला आहे. रोज लाखो वाहने या वाशी टोल मधून ये जा करत असतात. प्रत्येक वाहनाला दुपटीने टोल आकारून टोल प्रशासन नागरिकांची फसवणूक करून गडगंज पैसा बेकायदेशीर मार्गाने जमा करत आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कदापि सहन करणार नाही. टोल प्रशासनाने हा प्रकार तात्काळ थांबवावा यासाठी मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळाने वाशी टोल नाक्यावर धडक दिली. मनसेने टोल कर्मचाऱ्यांना सांगितले की, तांत्रिक कारणामुळे फास्ट टॅग मशीन बंद असल्यास फास्ट टॅग खात्यामध्ये पैसे शिल्लक असलेल्या नागरिकांकडून रोख पैसे न घेता फास्ट टॅग नंबरच्या आधारे काही वेळानंतर टोल आकारावा व त्या वेळेत टोल न आकारता वाहन सोडण्यात यावे असा शासन निर्णय आहे. मग वाशी टोल प्लाझावर याची अंमलबजावणी का होत नाही? असा प्रश्न गजानन काळे यांनी उपस्थित केला.

 तात्काळ त्याची अंमलबजावणी करावी व नागरिकांची लूट थांबवावी तसेच त्या संदर्भातील माहिती फलक प्रत्येक टोल बूथवर दर्शनी भागात लावावा, अशी आग्रही मागणी मनसेने केली.

तसेच अशा पद्धतीने दुप्पट पैसे ज्या नागरिकांकडून जमा केले असतील त्यांच्या खात्यावर ते तात्काळ वर्ग करावेत... अन्यथा वाशी टोल प्रशासनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा ही मनसेने दिला. 

मनसेच्या या शिष्टमंडळात मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, वाहतूक सेना सरचिटणीस श्री. नितीन खानविलकर, मनविसे शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, रोजगार शहर अध्यक्ष सनप्रीत तूर्मेकर, जनहित शहर संघटक अमर पाटील, महिला सेना उपशहरअध्यक्ष अनिथा नायडू, दिपाली ढवूल, शहर सचिव यशोदा खेडस्कर, चित्रपट सेना मा. शहर संघटक किरण सावंत, मनसे विभाग अध्यक्ष सागर विचारे, चंद्रकांत मंजुळकर, उमेश गायकवाड, नितीन नाईक, नागेश लिंगायत, उपविभागअध्यक्ष संदेश खांबे, संजय पाटील, संजय शिर्के, संतोष टेकवडे, शाखा अध्यक्ष प्रणित डोंगरे, गणेश पाटील, जालिंदर पवार, शैलेश पांजगे, वाहतूक सेनेचे संदीप दहिफळे, विद्यार्थी सेनेचे ध्रुव मोहिते, शंकर घोंगडे, मयंक घोरपडे, महिला सेनेच्या विद्या इनामदार, ललिता कांबळे, संगीता वंजारी, प्रियांका शिरोडकर, चित्रपट सेनेचे महादेव डोंगरे, विशाल कदम आणि मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पनवेल मध्ये तृतीय पंथीयांमध्ये मतदार जनजागृती