वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
इलेक्ट्रॉनिक स्मार्ट मीटरला खारघरवासियांचा विरोध
खारघर : खारघरमध्ये ‘महावितरण'च्या स्मार्ट इलेक्ट्रॉनिक स्मार्ट मीटर संदर्भात आयोजित केलेल्या चर्चासत्रात उपस्थित नागरिकांनी आक्षेप नोंदवून विरोध दर्शविला.
‘महावितरण'मार्फत राज्यात इलेक्ट्रॉनिक स्मार्ट मीटर बसवण्याचे नियोजन सुरू असून या संदर्भातील टेम्प्लेट ‘महावितरण'कडून सर्व सोसायट्यांना दिले जात आहे. खारघर, सेक्टर-१, २ आणि ८ मधील रहिवाशांना इलेक्ट्रॉनिक स्मार्ट मीटर संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘भाजपा'चे रायगड जिल्हा सचिव आणि खारघर, सेक्टर-८ मधील रहिवासी कीर्ती नवघरे यांनी सेक्टर-८ मधील विरुंगळा केंद्रात स्मार्ट मीटर संदर्भात चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्रात स्मार्ट मीटर संदर्भात माहिती देण्यासाठी ‘महावितरण'चे अधिकारी उपस्थित होते. मात्र, या चर्चासत्रात उपस्थित नागरिकांनी स्मार्ट वीज मीटर संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले असता, महावितरण अधिकाऱ्यांकडून समाधान कारक उत्तरे मिळाली नाहीत. यावेळी ‘महावितरण'च्या अधिकाऱ्यांनी नागरिकांकडून स्मार्ट वीज मीटर विषयी उपस्थित केलेल्या शंकेचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न सुरु असून लवकरच आपणास माहिती दिली जाईल, असे सांगितले. या चर्चासत्रात सेक्टर-१, २ आणि ८ मधील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.