वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
बेलापूर मधील ६४ अनधिकृत झोपडया निष्कासित
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिका अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे आणि उप आयुक्त (अतिक्रमण) भागवत डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका अतिक्रमण विभाग मार्फत बेलापूर विभागातील बेघर हटविण्याची कारवाई करण्यात आली
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील बेलापूर सेक्टर-८ मधील दुर्गामाता नगर येथे असलेल्या भुंखडावर उभारण्यात आलेल्या ६४ अनधिकृत झोपडया बेलापूर अे - विभाग कार्यालय मार्फत निष्कासित करण्यात आल्या आहेत.
यावेळी महापालिका बेलापूर विभाग सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे, अे विभाग बेलापूर कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस तैनात होते. सदर मोहिमेकरीता १ पोकलन,२२ मजूर, १ आयचर वाहन आणि १ पिकअप वाहन यांचा वापर करुन बेकायदा झोपड्या जमीनदोस्त करण्याची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, महापालिका अतिक्रमण विभाग मार्फत यापुढे देखील अनधिकृत झोपड्या निष्कासित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे यांनी सांगितले.