वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात २,७०० कोटींची विकास कामे
भाईंदर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिलेली २,७०० कोटी रुपयांची विकास कामे प्रगतीपथावर असून त्यातील अर्ध्या कामांचे लोकार्पण येत्या ४ महिन्यात होईल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यवत केला आहे.
मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील विकास कामाचा आढावा घेण्यासाठी महापालिका मुख्यालयात बोलवलेल्या बैठकीत ना. सरनाईक बोलत होते. सदर बैठकीला मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, ‘एमएमआरडीए'चे अतिरिक्त आयुक्त, सूर्या प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
सरनाईक पुढे म्हणाले की,
‘महायुती सरकार'च्या कालखंडात ना. एकनाथ शिंदे यांनी मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रासाठी सर्वाधिक निधी दिल्याचे राज्यातील एकमेव उदाहरण असेल. मंजूर निधीतील अर्ध्या कामांचे लोकार्पण येत्या ४ महिन्यात होईल, तर उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याचा मानस आहे, असे ना. प्रताप सरनाईक म्हणाले.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महापालिका आयुक्त शर्मा यांना निर्देश दिले. तसेच महापालिका भूखंड अतिक्रमणमुक्त करणे, स्तनदा माता, लहान मुले यांना सोयी-सुविधा देण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या प्रत्येक उद्यानात एक हिरकणी कक्ष उभारण्यात यावा, पाळीव प्राण्यांची स्मशानभूमीची निर्मिती करणे यांचा समावेश आहे. तसेच सदर बैठकीत सुर्या पाणी पुरवठा योजना, जुन्या धोकादायक इमारतींचा प्रश्न, दिव्यांगांचे प्रश्न, अग्निशामक दलाची भरती प्रक्रिया, आदिंचा आढावा ना. सरनाईक यांनी यावेळी घेतला.