नवी मुंबईतील बार, पब व वाईन शॉप परिसरावर नजर ठेवण्याची काँग्रेसची  मागणी

नवी मुंबई : पुण्यात घडलेल्या ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या घटेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नवी मुंबईतील बार, पब व वाईन शॉप परिसरावर नजर ठेवण्याची  मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे एका निवेदनातून  केली आहे.

नवी मुंबई शहरात दिघा ते बेलापुरदरम्यान अनेक बिअर बार, पब आहेत. पुण्यात ड्रक ॲण्ड ड्राईव्हची दुर्घटना घडलेली आहे. विनानोंदणीची गाडी घेऊन अल्पवयीन बालकाने बार-पबमध्ये जाऊन मद्यप्राशन केले व दोघांना अपघातात उडविले आहे. नवी मुंबईतही या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे. नवी मुंबईतील पब, बारमध्ये तसेच वाईन शॉपवर अल्पवयीन बालके दिसतात. मुळात अल्पवयीन बालकांना पब, बिअरबारमध्ये शिरकाव करुन देणेच बेकायदेशीर आहे. वाईन शॉपचालकांनीही त्यांना मद्य विक्री करणे चुकीचे आहे.नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बार आणि पबचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरात रात्रभर सुरू असणाऱ्या डान्सबार आणि पब मुळे पामबीच रोडवर मोठ्या प्रमाणात अपघातांची मालिका  वाढली आहे. ठाणे बेलापूर रोडवर,पामबीच रोडवर, मुंबई पुणे रोडवर व सायन पनवेल रोडच्या लगत असणारे अनेक बार हे रात्रभर सुरु असल्याचे रविंद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे. 

अल्पवयीन मुले दारू पिऊन गाडी चालवित असल्याचे हमखास दिसत आहेत. मात्र मोठा अपघात झाल्याशिवाय प्रशासन जागे होत नाही असे चित्र या दोन आठवड्यापासून दिसत आहे. पुण्याच्या घटनेतून बोध घेऊन नवी मुंबई पोलिसांनी वेळीच सावध हाेताना पब, बारवर कारवाई करावी अन्यथा पुणे पोलिसांसारखे नवी मुंबई पोलीसांनाही बदनाम व्हावे लागेल.

नवी मुंबई शहरात असे काही घडू नये यासाठी नवी मुंबई पोलीसांनी नवी मुंबई शहरातील बार, पब व वाईन शॉप परिसरावर नजर ठेऊन अल्पवयीनांना प्रवेश देणाऱ्या व मद्य देणाऱ्या बार, पब आणि वाईन शॉपवर कठोर कारवाई करण्याची मागणी रविंद्र सावंत  आणि काँग्रेस नेते अंकुश सोनवणे, सचिव विद्या भांडेकर , उत्तम पिसाळ, रामराजे, दिघंबर पंडित , संजय सुतार यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे  भेट घेऊन केली आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महापालिका शहर अभियंता पदी कोणाची वर्णी?