विधान परिषदेच्या शिक्षक - पदवीधर मतदारसंघासाठीची निवडणूक

नवी मुंबई :  भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीत  छाननी नंतर एकूण ८८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

या निवडणुकीकरिता  उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी १० जून २०२४ रोजी करण्यात आली. यामध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघात १०, कोकण विभाग पदवीधर २५, नाशिक विभाग शिक्षक ३६ तर मुंबई शिक्षक मतदारसंघात १७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १२ जून २०२४ अशी आहे. २६  जून २०२४ रोजी चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. १ जुलै २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया ५ जूलै २०२४ रोजी पूर्ण होणार आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

माझ्या विजयात नवी मुंबई भाजपा कार्यकर्ते- पदाधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान