माझ्या विजयात नवी मुंबई भाजपा कार्यकर्ते- पदाधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान 

नवी मुंबई : ठाणे लोकसभेतील माझ्या विजयामध्ये नवी मुंबई भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे  मोलाचे योगदान  असल्याची भावना महायुतीचे  नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे.

खासदारपदी दणदणीत  विजय झाल्यानंतर  आभार व्यक्त करण्यासाठी खासदार म्हस्के नवी मुंबईत आले होते. याप्रसंगी नवी मुंबई भाजपाच्या वतीने  त्यांचा सत्कार करण्यात आला.  आमदार गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, स्थायी  समितीचे माजी सभापती जयाजी नाथ  यांच्यासह नवी मुंबई भाजपाचे  ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते  उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना खासदार म्हस्के यांनी  उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचारासाठी अवघे 14 ते 15 दिवस मिळाले होते, असे सांगून नाईक यांचे आशीर्वाद घेतले आणि प्रचाराला सुरुवात केली. नाईकांच्या नेतृत्वात नवी मुंबई भाजपाचे  सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी  माझ्या विजयासाठी मोलाचे सहकार्य केले. माझ्या विजयाचे आपण सर्व शिलेदार आहात असे नमूद केले.  आपण जेव्हा आवाज द्याल तेव्हा मी उपस्थित असेल, असा शब्द देखील खासदार म्हस्के यांनी यावेळी दिला.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 पेंढारकर कॉलेज बचाव मोहीम; माजी विद्यार्थी, राजकीय नेतेमंडळीचे उपोषण