संजीव नाईक यांच्याविरुध्द आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा

नवी मुंबई : ‘भारत निवडणूक आयोग'च्या अधिसुचनेनुसार मुंबई विभाग पदवीधर, शिक्षक आणि कोकण विघात पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीची आचारसंहिता सुरु असतानाही, या कालावधीत विनापरवानगी सभा घेवून आणि मतदारांवर प्रलोभन टाकून आचारसंहिता भंग केल्याबद्दल भाजपा नेते तथा माजी खासदार संजीव नाईक यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'चे प्रववते रविंद्र सावंत यांनी ‘कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ'चे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुवत (सामान्य प्रशासन-कोकण विभाग) अमोल यादव यांच्याकडे केली आहे.

सद्यस्थितीत मुंबई विभाग पदवीधर, मुंबई शिक्षक तथा कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून येत्या २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे कोकण परिश्रेत्रात आदर्श आचारसंहिता लागू आहे. आचारसंहिता कालावधीत राजकीय नेत्यांनी विनापरवाना सभा घेणे आणि मतदारांना प्रलोभने दाखवणे म्हणजे आचारसंहितेचा भंग करण्याचा प्रकार आहे. माजी खासदार तथा भाजप नेते संजीव नाईक यांनी १४ जून रोजी अग्निशमन दल नवी मुंबई आणि नवी मुंबई महापालिका सार्वजनिक रुग्णालय वाशी येथील कर्मचारी, अग्निशामक, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लिपीक, अधीक्षक आदि कर्मचाऱ्यांची विनापरवाना बैठक घेवून त्यांच्या विविध समस्यांची सोडवणूक करण्याचे आमिष  दाखवले आहे. या बैठकीत संजीव नाईक यांनी अनेक कामगारांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

वास्तविक पाहता सदर सर्व कर्मचारी आणि  निमवैद्यकीय सेवक पदवीधर असून कोकण-मुंबई पदवीधर मतदारसंघाचे मतदार आहेत. मतदारांना विनापरवानगी विविध प्रलोभने दाखवणे आचारसंहितेचे निर्विवाद उल्लंघन आहे. त्यामुळे विना परवानगी बैठक घेतल्याबद्दल संजीव नाईक यांच्याविरुध्द आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 दुर्गाडी किल्ल्याच्या ढासळलेल्या बुरुजाची खा. सुरेश म्हात्रे यांच्याकडून पाहणी