शुक्रवारी ठाण्यात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा व वागळे (काही भागात) या प्रभाग समिती क्षेत्रामध्ये गुरुवार २३ मे रात्री १२ पासून शुक्रवार २४ मे रात्री १२ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून येणारे पाणी या भागात दिले जाते. एमआयडीसीच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व वाहिनीच्या कटाई नाका ते शीळ टाकी येथे तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे  त्यांच्याकडून होणारा पाणी पुरवठा दि. २३/०५/२०२४ रात्री १२.०० ते शुक्रवार दि. २४/०५/२०२४ रात्री १२.०० वा एकूण २४ तास बंद राहणार आहे.

या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिके अंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्रमांक २६ व ३१ चा काही भाग वगळता ) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये, वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहील.

पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी. या काळासाठी पुरेसा पाणी साठा करून ठेवावा तसेच पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 खाडीकिनारा स्वच्छतेचा वसा