मतमोजणीच्या अनुषंगाने आज अवजड वाहनांना अटल सेतूवरून जाण्यास मनाई  

नवी मुंबई : 31 दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघ व 30 दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाची मत मोजणी मुंबईतील शिवडी वेअर हाऊसमध्ये होणार आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा होण्याची शक्यता असल्याने, कायदा व सुव्यवस्था तसेच सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून आज मंगळवारी सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अटल सेतुवर (एमटीएचएल) सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या कालावधीत सदर वाहनांना पर्यायी मार्गावरुन जाण्याचे सुचित करण्यात आले आहे. नवी मुंबई वाहतुक विभागाचे पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे यांनी  याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.  

मुंबईतील शिवडी वेअर हाऊसमध्ये 31 दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघ व 30 दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाचे स्ट्रॉग रुम आहे. मंगळवारी 4 जुन रोजी सदर ठिकाणी मत मोजणी असल्याने मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अटल सेतुवरुन शिवडी येथे बाहेर पडण्याच्या (एक्झिट) मार्गावर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना अटल सेतु दक्षिण वाहिनी येथून येण्यास मनाई करण्यात आली आहे. सदर मार्गावर हलक्या वाहनांना येण्यास परवानगी आहे. परंतु, त्यांना शिवडी एक्झीट येथे उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. या वाहनांना कुलाबा एक्झीट व वडाळा एक्झीट येथून पर्यायी मार्गाने जाण्यास परवानगी परवानगी देण्यात आली आहे.  

या कालावधीत अवजड वाहनांना नवी मुंबई वाशी मार्गे तर हलक्या वाहनांना कुलाबा येथे बाहेर जाण्याचा मार्ग (एक्झीट) व वडाळा येथून बाहेर जाण्याचा मार्ग (एक्झीट) निश्चित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना अटल सेतू (एमटीएचएल) मार्गे दक्षिण वाहिनी वरुन शिवडी येथून प्रवेश करण्यास देखील मनाईक करण्यात आली आहे. या कालावधीत सदर वाहनांना नवी मुंबई वाशी खाडी पुल मार्गे इच्छीत स्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या वाहतुक नियंत्रण अधिसुचनेतून इतर जीवनावश्यक वस्तू वाहून नेणा-या वाहनांना तसेच पोलीस, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळण्यात आले आहे.  

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

करंजाडेवासिय पाणी टंचाईने त्रस्त