एपीएमसी मधील नालेसफाईला अखेर मुहूर्त

वाशी : पावसाळ्यात वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आवारात पाणी साचू नये म्हणून दरवर्षी एप्रिल महिन्यातच एपीएमसी मधील नालेसफाई करायला सुरुवात केली जाते. मात्र, यंदा मे महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला तरी देखील एपीएमसी मधील नालेसफाई करण्यास सुरुवात करण्यात आली नव्हती. मात्र, मे महिना संपायला अवघे दोन दिवस शिल्लक असताना एपीएमसी मधील नालेसफाईला मुहूर्त सापडला आहे.

पावसाळयात नवी मुंबई शहरात पाणी तुंबू नये म्हणून नवी मुंबई महापालिका नवी मुंबई शहरातील सर्व नाल्यांची सफाई करते. त्याच धर्तीवर बाजार समिती प्रशासन देखील एपीएमसी आवारात मान्सुनपूर्व नालेसफाई करते. वाशी मधील एपीएमसी मार्वेÀट मुख्य रस्त्यालगत आहे. मुख्य रस्त्यावरील नाले, गटारे उंच भागात आहेत. तर एपीएमसी बाजार परिसर सखल भागात आहे. पावसाळ्यात एपीएमसी मधील मुख्य प्रवेशद्वार आणि एपीएमसी मार्वेÀट परिसरात पाणी साचते. पावसाळ्यात नाल्यातील गाळ काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे योग्य रितीने नालेसफाई होत नाही. परिणामी एपीएमसी बाजार आवारात पाणी साचण्याच्या घटना घडतात.त्यामुळे मे महिन्यात एपीएमसी बाजारातील नालेसफाई होणे गरजेचे होते. यंदा मात्र एपीएमसी बाजारातील मान्सूनपूर्व नालेसफाईला  विलंब झाला असून, मे अखेरीस एपीएमसी बाजार आवारातील मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरुवात झाली आहे. या कामामध्ये चार महिने नाल्याची देखभाल करण्याचा समावेश आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'ची कंपन्यांना वलोजर नोटीस