शिक्षक, विद्यार्थ्यासाठी ‘मनसे'चे लवकरच आंदोलन

डोंबिवली : के. व्ही. पेंढारकर महाविद्याल्याच्या प्रशासनाविरोधात ‘सेव्ह पेंढारकर' मोहिमेअंर्तगत माजी विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला १० दिवस उलटले आहेत. २४ जून रोजी ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना'च्या शिष्टमंडळाने उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तसेच त्यांनी पेंढारकर संस्था अध्यक्ष देसाई यांचीही भेट घेतली. पेंढारकर संस्थेच्या मनमानी कारभार विरोधात मनसे शिक्षक आणि विद्यार्थ्यांकरिता लवकरच आंदोलन करु, असे ‘मनविसे'चे महाराष्ट्र प्रदेश तथा मुंबई विद्यापीठ प्रमुख संघटक संतोष गांगुर्डे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

‘मनविसे'चे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार ‘मनविसे'च्या शिष्टमंडळाने डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाचे संस्था चालक प्रभाकर देसाई यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश राज्य संघटक संतोष गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण जिल्हा अध्यक्ष धनंजय गुरव, डोंबिवली शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे, मनविसे कल्याण लोकसभा जिल्हा सचिव प्रितेश पाटील, उपजिल्हा अध्यक्ष दिप्तेश नाईक, शहर सचिव प्रितेश म्हामुणकर, उपशहर अध्यक्ष प्राजक्ता देशपांडे, यतिन पांडगावकर, प्रतिक देशपांडे, शहर संघटक हरीश पाटील, संजय चव्हाण यांनी चर्चा केली. त्यानंतर शिष्टमंडळाने उपोषणकर्त्यांची भेट घेतली.

‘मनसे'च्या आमच्या आंदोलनात कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोवर मनसे आवाज उठविणार. आम्ही संस्था चालक देसाई यांची भेट घेतली. ‘मनसे'च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले होते. या निवेदनाचे त्यांनी उत्तरे  विद्यापीठ पब्लिक युनिवर्सिटी ॲवटचे उल्लंघन करणारे असून पत्र आहे. स्वतःचा आडमुठेपणा आणि स्वतःचे स्वायत्तापण राखण्यासाठी सदर प्रकार केले होते.याबाबत समज देण्यासाठी आम्ही आलो होतो. अनुदानित महाविद्यालय बंद करुन विनाअनुदानित करत आहात, याचे कारण काय? याचे उत्तर विचारले असता देसाई यांनी त्यांना विद्यापीठाकडून तसेच केंद्र सरकारच्या विद्यापीठाच्या आयोगाकडून स्वायत्ता बहाल झाली आहे. त्यामुळे मी काहीही शकतो. मात्र, त्यांना आम्ही सांगितले की, आम्हाला कुठेही पूर्णपणे स्वायत्ता मिळाली नाही. शिक्षकांना एका खोलीत का बसवले याचाही जाब विचारला. शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांना शिकविण्यास तयार आहेत, असे संतोष गांगुर्डे यांनी सांगितले.

शिक्षकांना पगार मिळाला नाही याबाबत देसाई म्हणाले शासनाचे म्हणणे आहे की जे इन्चार्ज प्रिसिंपल आहेत, त्यांची नेमणूक केली नाही. त्यामुळे बिल आले नसल्याने पगार दिले नाही. ‘मनसे'चा याबाबत संघर्ष सुरु आहे. याचा जाब विचारु. अमित ठाकरे यांच्यासोबत शिक्षणमंत्री केसरकर यांची भेट घेऊन त्यांना विचारणा करु, असेही संतोष गांगुर्डे म्हणाले.

महाविद्यालयात बाऊन्सर आणि सुरक्षा रक्षक ठेवण्यामागील कारण विचारले असता जे विद्यार्थी वर्गात बसत नाही, त्यांच्यासाठी बाऊन्सर आणि सुरक्षा रक्षक ठेवल्याचे सांगण्यात आले. वास्तविक पाहता विद्यापीठाने अशी परवानगी दिली नाही. विद्यार्थी वर्गात बसत नसतील तर त्यांच्यासाठी विद्यापीठाकडून कारवाई केली जाते. - संतोष गांगुर्डे, संघटक-मनविसे, महाराष्ट्र. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नरेंद्र पाटील यांना ‘विधान परिषद'ची उमेदवारी देण्याची मागणी