पनवेल महापालिका तर्फे खारघरमध्ये विशेष करभरणा शिबीर

पनवेल : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पनवेल महापालिकेच्या वतीने मालमत्ता कराच्या सुधारित देयकांचे वाटप करण्यात आलेले आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार नागरिकांना बिले भरणे सोयीचे व्हावे यासाठी नागरिकांच्या सोयीसाठी खारघर मधील ३६ सोसायटीमध्ये २२ जून २०२४ पासून विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांचा लाभ घेऊन तात्काळ कर भरणा करावा, असे आवाहन महापालिका तर्फे करण्यात आले आहे. या आवाहनाला मालमत्ता धारकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मालमत्ता कर भरण्यासाठी ३० जूनपर्यंत शनिवार, रविवारी देखील महापालिका मुख्यालय आणि प्रभाग कार्यालय सुरु असणार आहेत.

पनवेल महापालिका मार्फत आकारण्यात आलेल्या पूर्वलक्षी मालमत्ता कराबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या स्पेशल लीव्ह पिटीशन क्रमांक १०८४९/२०२३ मधील सिव्हिल अपील क्रमांक ६०६५/२०२४ संदर्भात अंतरिम निकाल २९ एप्रिल २०२४ रोजी लागला आहे. सदर अंतरिम निकालानुसार कर निर्धारण वर्ष २०२१-२२ पासून मालमत्ता कराच्या सर्व थकीत रवकमेचा भरणा २ महिन्यांच्या आत करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. सदर आवाहनाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून १८ जून पासून रोज सुमारे ४ कोटींचा भरणा महापालिकेच्या तिजोरीत होत आहे. २९ एप्रिल ते २२ जून २०२४ या कालावधीत पनवेल महापालिकेच्या तिजोरीत ९२.६२ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. तर विशेष शिबीराच्या माध्यमातून खारघर विभागात २.६७ कोटींची कर वसुली झाली आहे.

दरम्यान, २२, २३ आणि २४ जून रोजी खारघर मधील निसर्ग ग्रुप हाईड पार्क, जलवायू डिफेन्स, खाघर सेलिब्रेशन व्ोÀएच-४, रघुनाथ विहार आर्मी, स्पॅगेटी, केसर गार्डन या सोसायट्यांमध्ये तर २५ जून रोजी महालक्ष्मी, मातृछाया, वास्तुविहार, प्रियदर्शनी, हेक्स ब्लॉक्स, जलवायु विहार डिफेन्स या सोसायट्यांमध्ये शिबीर पार पडले.

ज्या मालमत्ताधारकांना अद्यापही सुधारित मालमत्ता कर देयक प्राप्त झालेले नाही, त्यांनी ऑनलाइन पोर्टल (संकेतस्थळ) किंवा महापालिका कार्यालयास भेट देऊन सुधारित देयक उपलब्ध करुन घ्यावे. महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी  ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच panvelmc.org या वेबसाईटवर जाऊनही मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. याचा लाभ मालमत्ताधारकांनी घ्यावा. मालमत्ताधारकांना काही शंका असल्यास  १८००-५३२०-३४०  या टोल फ्री क्रमांवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका तर्फे करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सुधारीत देयके पुन्हा तयार करावी लागल्याने सन २०२४-२५च्या चालू कर मागणीवर ३१ मे अखेर देण्यात आलेली ५ टक्के इतकी सूट ३० जून २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सदर सुविधेचा लाभ घ्यावा. याशिवाय मालमत्ता कराचा भरणा ऑनलाईन केल्यास एकूण २ टक्के इतकी सुट दिली जात असल्याने नागरिकांनी त्वरित कर भरणा करुन महापालिकेला सहकार्य करावे. तसेच पनवेल शहराच्या सर्वांगीण विकासास हातभार लावावा.

-मंगेश चितळे, आयुवत-पनवेल महापालिका.

खारघर मधील सोसायट्यामध्ये होणारे शिबीरः
दिनांक सोसायटीचे नांव
२६ जून साईमन्नत, महावीर, साई साक्षात, रेल विहार, पटेल हेरीटेज, गुडविल पॅराडाईज.
२७ जून केंद्रीय विहार, चतुर्भुज, उत्सव, शहा आर्केड, हावरे टीआर, प्राईम रोझ, रासवुड हाईटस्‌.
२८ जून शाह किंग्डम, केसर एक्झोटिका, मकरंद विहार, ओम हार्मोनी, कामधेनु.
२९,३० जून रेजन्सी गार्डन, केसर हार्मोनी, हावरे स्प्लेंडर, पारिजात, भुमीराज वुडस्‌, कुंजविहार. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे मधील इमारतींवरील पत्रे, सौर ऊर्जेची पॅनल, मोबाईल टॉवर, बांधकामाच्या टॉवर क्रेनची लवकरच तपासणी