कै. प्रशांत पाटील यांना विविध पक्षीय मान्यवरांची श्रध्दांजली

उरण : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)'चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, ‘उरण'चे सुपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक नेतृत्व प्रशांत भाऊ पाटील यांचे २० जून २०२४ रोजी हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. कै. प्रशांत पाटील यांच्यावर प्रेम करणारे पदाधिकारी-कार्यकर्ते, समर्थक मित्रवर्ग, विविध पक्षाचे नेते महाराष्ट्रात सर्वदूर असल्याने सर्वांना एकत्रित करुन त्यांना या आपल्या लाडवया नेत्याला श्रध्दांजली वाहण्यासाठी २७ जून रोजी जेएनपीटी टाऊनशीप मधील मल्टीपर्पज हॉल येथे ‘शोकसभा'चे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी कै. प्रशांत पाटील यांच्या आई हिरावती पाटील, पत्नी प्रज्ञा पाटील, मुले आदित्य पाटील, अद्वैत पाटील, भाऊ प्रवीण पाटील, राजस पाटील, कपिला पाटील, नुतन भट्टाचार्य यांच्यासह माजी आमदार बाळाराम पाटील, मनोहर भोईर, ‘काँग्रेस'चे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, आर. सी. घरत, ‘मनसे'चे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, कामगार नेते ॲड. सुरेश ठाकूर, कॉम्रेड भूषण पाटील, दिनेश पाटील, ‘उरण सामाजिक संस्था'चे अध्यक्ष सुधाकर पाटील, संतोष पवार, ‘शिवसेना'चे दिपक भोईर, जगजीवन भोईर, ‘काँग्रेस'च्या महिला अध्यक्ष रेखा घरत, कामगार नेते संतोष घरत, ‘राष्ट्रवादी'चे सुरदास गोवारी, ॲड. भार्गव पाटील, ‘उरण नगरपरिषद'चे गटनेते गणेश शिंदे, ‘शेकाप'च्या महिला तालुकाध्यक्ष सीमा घरत, हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे, शिक्षक नेते नरसु पाटील, जेएनपीटी विश्वस्त रवि पाटील, माजी पंचायत समिती सदस्य दिपक ठाकूर, मच्छिमार नेते मार्तंड नाखवा, दत्ताजी मसुरकर, रमेश गुडेकर, संदानंद येवले, काशीनाथ पाटील, गोपाळ पाटील, नरेश रहाळकर, सुदाम पाटील, मदन गोवारी, कौतिक भांडारकर, जयद मुल्ला, आदिंसह विविध पक्षीय, संघटनांचे पदाधिकारी-कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी आपल्या कै. प्रशांत पाटील यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांना शब्दसुमनांजली अर्पण केली. सदर श्रध्दांजली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश पंडीत यांनी तर आभार प्रदर्शन ‘जेएनपीटी'चे विश्वस्त दिनेश पाटील यांनी केले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महाराष्ट्रात भाजप पुन्हा जिंकणार नाही