३९ वर्षानंतर नवीन शेवा गावाला हक्काची जमीन

उरण : उरण तालुक्यातील न्हावा-शेवा बंदरासाठी विस्थापित झालेल्या जेएनपीटी पुनर्वसित नवीन शेवागांवची ३३.६४ हेवटर जमिनीची कायम हवक मोजणी येत्या १ जुलै २०२४ पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन शेवा ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

उरण तालुक्यातील न्हावा-शेवा बंदराच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शेवा गांवठाणाची जमीन सुधा लागेल असे बनावट कारण सांगून शासनाने शेवा गावातील ग्रामस्थांना विस्थापित करुन मौजे बोकडवीरा येथील जमिनीवर गेली ३९ वर्ष तात्पुरत्या स्वरुपात वास्तव्यास ठेवले होते.

एमआरपीटीपी ॲक्ट १९७६ नुसार या विस्थापितांचे पुनर्वसन करणे गरजेचे होते. परंतु, या विस्थापितांना शासनाने दुर्लक्षित करून ३३ हेक्टर ऐवजी फक्त १० हेक्टरवर तात्पुरत्या स्वरुपात वास्तव्यास ठेवले होते. गेली अनेक वर्षे गावकरी संघर्ष करुन, आंदोलने करुन आपला हक्क मागत होते. पण, शासन आणि जेएनपीटी प्रशासन याकडे दुर्लक्ष करुन खोटी नाटी कारणे सांगून टाळाटाळ करीत होते. अखेर गेल्या काही महिन्यांपासून नवीन शेवा गावातील ग्रामस्थांनी केलेले अथक प्रयत्न आाणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. येत्या १ जुलै २०२४ रोजी जेएनपीटी पुनर्वसित नवीन शेवा गावाची ३३.६४.०५ हेक्टर जमिनीची कायमहक्क मोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 एपीएमसी धान्य बाजारात खड्डेच खड्डे