वटपौर्णिमेच्या निमित्ताने नाविन्यपूर्ण उपक्रम!

नवी मुंबई : वर्तमानातील वाढते तापमान, वाढते प्रदूषण, ऋतुमानातील अनिश्चितता यामुळे झाडांचे महत्व अधोरेखीत होत आहे. वडाच्या झाडाचे आयुष्य हे तब्बल 100 वर्षाहून अधिक असल्याने तसेच ते 20 तास ऑक्सिजन देत असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आपल्या परिसरात वडाचे झाड असणे हे हितावह आहे. वडाच्या झाडाचे आयुर्वेदिक दृष्टीने देखील महत्व आहे. वडाच्या झाडाचे महत्व लक्षात घेऊन नवी मुंबई सजग नागरीक मंचाने वट पौर्णिमेच्या निमित्ताने महिलांसाठी स्वखर्चाने वडाचे झाड लावण्याची संकल्पना मांडली होती. या संकल्पनेला आग्रोळीतील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांनी स्वखर्चाने वडाची 21 झाडे वटपौर्णिमेच्या निमित्ताने लावून आगळ्या वेगळ्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली आहे.  

वटपौर्णिमा  हा महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा सण. पुढील 7 जन्म हाच पती मिळावा, पतीला वडाच्या झाडाप्रमाणेच दीर्घायुष्य लाभावे.. यासाठी या दिवशी महिला नवे वस्त्र परिधान करुन, दागिन्यांनी नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करत असतात, प्रार्थना करत असतात. अलीकडच्या धकाधकीच्या जीवनात तर काही महिला वडाची फांदी आणून रेल्वेत, सोसायटीत वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाचे पूजन करताना दिसतात, वस्तुत प्रत्येक हिंदू सण, व्रतवैकल्याच्या मागे काही ना काही शास्त्रीय दृष्टिकोन असतो.  

वृक्षतोडीमुळे तापमानात, प्रदुषणात प्रचंड वाढ होऊ लागली आहे. तसेच ऋतुमानात देखील अनिश्चितता वाढली आहे. वडाच्या झाडाचे आयुष्य हे तब्बल 100 वर्षाहून अधिक असुन ते 20 तास ऑक्सिजन देत असते, त्यामुळे वडाचे झाड परिसरात असणे आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. वडाच्या झाडाचे आयुर्वेदिक दृष्टीने देखील महत्व आहे. त्यामुळे सजग नागरिक मंच नवी मुंबईने वडाच्या झाडाचे महत्व लक्षात घेऊन तसेच हिंदू संस्कृतीतील व्रतवैकल्ये, सण व आधुनिकता यांची सांगड घालून एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याची संकल्पना मांडली होती.  

त्यानुसार प्रत्येक महिलेने एका वडाच्या झाडाची किंमत व ते लावण्यासाठी येणारा खर्च करण्याची ती संकल्पना होती, या संकल्पनेला आग्रोळीतील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन त्यांनी स्वखर्चाने वडाची 21 झाडे लावून वटपौर्णिमा साजरी केली आहे. यापैकी काही झाडे लावण्यात आली, तर उर्वरित झाडे पारसिक हिल वर लावण्यात येणार आहेत. यासोबतच काही पिंपळाची व कंडुनिबांची झाडे देखील आणून ठेवलेली आहेत व ती लवकरच लावण्यात येणार आहेत. वटपौर्णिमेच्या निमित्ताने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सामाज माध्यमासह नागरीकांमधुन कौतुक होत आहे.  

वाढते प्रदूषण व वाढते तापमान याचा विचार करत यापुढे आम्ही दर वर्षी एक झाड लावू व अन्य ठिकाणी देखील प्रत्येक वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी अशा प्रकारे एक वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी करावी असे मत उपक्रमात सहभागी झालेल्या महिलांनी व्यक्त केले.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डीपीएस पलेमिंगो तलावाला ‘सिडको'कडून धोका?