पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

पनवेल: आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने पनवेल महानगरपालिकेच्यावतीने वडाळे तलावाजवळ भव्य स्वरूपात ‘योग दिवस’ साजरा करण्यात आला. पंतजली योग समितीचे, भारतीय नौसेनेचे निवृत्त लेफ्टनंट राम पलट यादव यांनी यावेळी उपस्थितांना योगासने व प्राणायम, ध्यान याबाबत मार्गदर्शन केले. पावसाळी वातावरण असून देखील या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी महापौर,लोकप्रतिनिधी, अतिरीक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त बाबासाहेब राजळे, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, घनकचरा व स्वच्छता विभागप्रुख अनिल कोकरे, भारत स्वाभिमान ट्रस्टचे जिल्हाप्रमुख रामबाबू मोरे, पंतजली योग समिती जिल्हा प्रभारी रविंद्र मोरे, पंतजली योग समितीचे योग संदेश प्रभारी अल्का अव्हाड, पतंजली योग समितीचे महामंत्री सरिता ठाकूर, भारत स्वाभिमन ट्रस्टचे सह जिल्हा प्रभारी राजेंद्र सिंह ,पनवेल ब्रम्हकुमारीजच्या इनचार्ज ताराबेन, डॉ. शुभदा नील, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांचे सदस्य, नागरिक उपस्थित होते.

भारताच्या प्राचीन संस्कृतीमध्ये योगाला प्रचंड महत्व होते. योगामुळे शरीर,मन दोन्हीही सुदृढ बनते. केवळ भारत देशच नाहितर साऱ्या जगाला आता योगाचे महत्व पटले आहे. योगाभ्यासाच्या जनजागृतीसाठी  21 जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जातो. पनवेल महानगरपालिकेच्यावतीने साजरा करण्यात आलेल्या या योग दिनाच्या कार्यक्रमाला पावसाळी वातावरण असून देखील सर्व वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पंतजली योग समितीचे राम पलट यादव यांनी अर्ध चक्रासन, ताडासन, वक्रासन, भुजंगासन, पवन मुक्तासन, अर्ध हलासन असे आसानाचे विविध प्रकार शिकवून त्याचे फायदे सांगितले. तसेच प्राणायमामध्ये कपालभाती, भ्रामरी, अनुलोम विलोम याबद्दल मार्गर्शन केले. याबरोबरच ध्यान करण्यास सांगून त्याचा शरीराला होणारा लाभ याबाबत सविस्तर माहिती दिली.
 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वटपौर्णिमेच्या निमित्ताने नाविन्यपूर्ण उपक्रम!