नेरुळ रेल्वे स्टेशन परिसराची लोकसहभागातून स्वच्छता

नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४' अनुषंगाने ‘स्वच्छता अपनाओ-बिमारी भगाओ' अभियान नागरिकांच्या सहभागातून संपूर्ण नवी मुंबई महापालिका क्षेत्रात राबविण्यात येत आहे. या अभियान अंतर्गत १ जुलै रोजी महापालिका आयुवत डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार आणि उपआयुवत (घनकचरा व्यवस्थापन विभाग) डॉ.अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली नेरुळ रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडील परिसरात सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत महापालिका नेरुळ विभाग सहाय्यक आयुवत तथा नेरुळ विभाग अधिकारी डॉ.अमोल पालवे यांनी नेरुळ विभाग कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि स्वच्छता मित्रांसह सक्रीय सहभागी होत स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पाडली.

सखोल स्वच्छता मोहीम मध्ये महाविद्यालयीन एनएसएस विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, स्थानिक रिक्षा ड्रायव्हर तसेच नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते. यावेळी प्लास्टिक बॉटल्स, रॅपर्स, प्लास्टिक, थर्माकोल आणि कागदाचे तुकडे आदी कचरा जमा करुन नेरुळ रेल्वे स्टेशन परिसर साफ करण्यात आला. या सखोल स्वच्छता मोहीम मध्ये एकूण ५० गोणी कचरा जमा करण्यात आला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 मोरबे धरणात ५१ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा