बेलापूर गावाचा होणार विकास!

नवी मुंबई : आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची विकास कामांची गंगा वाहत असून या सुनियोजित नवी मुंबई शहरामध्ये सर्व सुख-सुविधा अनुभवयास मिळतात. त्याचबरोबर दिवाळे स्मार्ट व्हिलेज बरोबर इतर गावांचा विकास साधण्यासाठी  करावयाच्या कामांसाठी आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी मुसळधार पावसात नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांसमवेत बेलापूर गावात होणाऱ्या विकास कामांची पाहणी केली. याप्रसंगी आमदार सौ. म्हात्रे यांच्या समवेत महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेता पंढरीनाथ पाटील, अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता अजय पाटील, कनिष्ठ अभियंता राजेश पाटील, ‘बेलापूर'चे सहा. आयुक्त शशिकांत तांडेल, संबंधित अधिकारी तसेच ‘राम मंदिर व्यवस्थापन समिती'चे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, नारायण मुकादम, संदेश पाटील, समाजसेवक कुंदन म्हात्रे, मनोज मेहेर, सुरेश म्हात्रे, कैलास म्हात्रे, कमलाकर म्हात्रे, कल्पेश कुंभार, विचारे पाटील, समाजसेविका ज्योती पाटील, नैना म्हात्रे, इंदू शेलार, सुभद्रा म्हात्रे, सुरेखा म्हात्रे तसेच  बेलापूर ग्रामस्थ उपस्थित होते.

बेलापूर गावातील स्थानिकांच्या मागणीनुसार बेलापूर गावात विकास व्हावा याकरिता केलेल्या प्रयत्नातून महापालिकेच्या क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद अंतर्गत महाराष्ट्र शासनामार्फत तब्बल २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या माध्यमातून बेलापूर गावात क्रीडा संकुल उभारणे, समाजपयोगी विकास कामे करण्यासह प्रस्तावित ५ मजली बहुद्देशीय इमारतीमध्येमल्टीलेवल कार पार्किंग, भाजी मार्केट, व्यायामशाळा, ग्रंथालय, बॅटमिंटन कोर्ट, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र अशा अनेक विविध प्रकारच्या सोयी-सुविधा, आदि सुविधा नागरिकांना लवकरच मिळणार आहेत, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

दरम्यान, बेलापूर मधील प्रभू श्री राम जन्म उत्सवाकरिता भूखंड मिळावा, मंदिराचा परिसर सुशोभिकरण करणे अशा अनेक विविध सोयी-सुविधा उपलब्ध होणार असून बेलापूर गाव स्मार्ट व्हिलेजकडे वाटचाल करणार आहे. त्याअनुषंगाने आयोजित पाहणी दौऱ्यामध्येे भर पावसात अधिकारी आणि ग्रामस्थ सहभागी झाले. तसेच या पावसाळयामध्ये संपूर्ण नवी मुंबईतील २९ गावातील जे नाले, गटार आहेत तुडुंब भरुन जाऊ नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे, अशा सूचना आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाची रखडली प्रवेश प्रक्रिया