अंमली पदार्थ विक्रेत्यांचे मोडले कंबरडे    

दिड वर्षामध्ये ८०३ कारवाया; ३०.८९ कोटींचे अंमली पदार्थ जप्त    

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांविरोधात ‘नशामुक्त नवी मुंबई' या विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई करुन शहरात सुरु असलेल्या अंमली पदार्थाच्या विक्रीचे रॅकेट मोडीत काढले आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील अंमली पदार्थाच्या खरेदी-विक्रीला चांगलाच आळा बसला आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अमंली पदार्थ विरोधी कक्षाने गत दिड वर्षाच्या कालावधीत अंमली पदार्थ, गुटखा विक्री आणि हुवका प्रकरणी एकूण ८०३ कारवाया करुन १२९८ आरोपींची धरपकड केली आहे. विशेष म्हणजे यात ५७ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. पोलिसांनी सदर कारवाईत तब्बल ३०.८९ कोटी रुपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ जप्त केले आहे.    

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाची खरेदी-विक्री होत असल्याचे तसेच या अंमली पदार्थाच्या आहारी शाळा-कॉलेज मधील विद्यार्थी आणि तरुणवर्ग जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यास पुढाकार घेतला. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने आणि विविध पोलीस ठाण्यांनी १ जानेवारी २०२३ ते ३१ मे २०२४ या दिड वर्षाच्या कालावधीत विविध ठिकाणी छापे मारुन अंमली पदार्थाच्या एनडीपीएस कलमांतर्गत एकूण ५९१ कारवाया केल्या. तसेच अंमली पदार्थांची तस्करी करणारे आणि बाळगणारे अशा एकूण ७०० आरोपींची धरपकड केली आहे.   
 
सदर कारवाईत तब्बल २८.५९ कोटी रुपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहे. यात ५.४० कोटी रुपयांचे ५.२९१ किलोग्रॅम कोकेन, ३१.५८ लाख रुपये किंमतीचे ३७४ ग्रॅम ब्राऊन शुगर, ८.४७ लाख रुपये किंमतीचे ६० ग्रॅम हेरॉईन,११.१७ कोटी रुपये किंमतीचे ११.५६८ किलोग्रॅम मेफेड्रॉन, ५५ हजार रुपये किंमतीचे ५५ ग्रॅम मेथेड्रॉन, ३.६४ कोटी रुपये किंमतीचे १८२.१०० किलोग्रॅम ट्रामाडोल टॅबलेटस्‌, ५०.४० लाखांचे ६.७४६ ग्रॅम एलएसडी पेपर त्याचप्रमाणे ५.९६ कोटी रुपयांचे ७.४२९ किलोग्रॅम मेथ्यॅक्युलॉन, ७१ लाखांचे ५.५०१ किलोग्रॅम चरस, २.०८ लाख रुपये किंमतीच्या १२७४ बॉटल्स कोडाईन, २३.८४ लाख रुपये किंमतीचे ५९६ ग्रॅम एमफेटामाईन, ४०.४८ लाखांचे ३३२ ग्रॅम एमडीएमए आणि ५१.७१ लाख रुपये किंमतीचा २६७ किलो वजनाचा गांजा असा अंमली पदार्थांचा समावेश आहे.    

गुटखा, हुक्का पार्लरवर कारवाई...  

अंमली पदार्थ विरोधी पथकाने मागील दिड वर्षामध्ये गुटखा बाळगणाऱ्या आणि त्याची विक्री करणाऱ्यांवर २३९ कारवाया करुन तब्बल २.१४ कोटी रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला गुटखा आणि सुगंधीत पान मसाला साठा जप्त केला आहे. या कारवाईत एकूण ५८८ आरोपींची धरपकड देखील केली आहे. तसेच शहरात छुप्या पध्दतीने चालणाऱ्या ७४ हुक्का पार्लरवर देखील पोलिसांनी कारवाई करुन ३३० जणांना अटक केली आहे. तसेच ५.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर कोपटाच्या ३८ कारवाया करुन पोलिसांनी ४३ आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच १०.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  

अंमली पदार्थ विरोधी जनजागृती...  

अंमली पदार्थ विरोधी कक्षाकडून युवकांमध्ये अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जनाजागृती करण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत शाळा, महाविद्यालये, विविध सोसायट्यांमध्ये अशा ३३ ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. 
 
परदेशी तस्करांवर कारवाई...    

शिक्षण, व्यवसायाच्या निमित्ताने नवी मुंबईत येणाऱ्या आफ्रिकन देशातील अनेक परदेशी नागरिक गुन्हेगारी कारवायांमध्ये तसेच अंमली पदार्थाच्या तस्करीत गुंतल्याचे आढळून आल्याने नवी मुंबई पोलिसांनी १ सपटेंबर २०२३ रोजी दुपारी एकाच वेळी ६ वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकून ७५ परदेशी नागरिकांची धरपकड केली होती. या कारवाईत पोलिसांनी सुमारे २ कोटी रुपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ जप्त केले होते.    

 त्याच महिन्यामध्ये नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या परदेशी नागरिकांवर सर्वात मोठी कारवाई करुन एकूण ३७ परदेशी नागरिकांना अटक केली होती. त्यापैकी अंमली पदार्थासह सापडलेल्या १४ परदेशी नागरिकांकडून सुमारे ५ कोटी रुपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ जप्त केले होते.  
त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी ६ ऑक्टोबर २०२३ रोजी वेगवेगळ्या ठिकाणी नियोजनबध्द धाडी टाकून १६ परदेशी नागरिकांची धरपकड केली होती. या धडक कारवाईत एका परदेशी नागरिकांकडून सुमारे ८५ लाख रुपये किंमतीचे एमडी आणि कोकेन जप्त करण्यात आले होते.  

नशामुक्त नवी मुंबई अभियान अंतर्गत शहरातील अंमली पदार्थाचे रॅकेट उध्वस्त करुन त्यांचे धंदे बंद करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यानुसार अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबद्दल नवी मुंबईतील शाळा-कॉलेज मधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम आणि उपक्रम देखील नियमित राबविण्यात येत आहेत. अंमली पदार्थासंदर्भात नागरिकांना काही माहिती मिळाल्यास त्यांनी अंमली पदार्थ विरोधी कक्षाकडे अथवा स्थानिक पोलिसांना त्याबाबतची माहिती द्यावी. सदर माहितीच्या आधारे तत्काळ कारवाई करण्यात येईल. 
- नीरज चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक - अंमली पदार्थ विरोधी कक्ष. 

नवी मुंबई पोलिसांनी गत दीड वर्षाच्या कालावधीत अमली पदार्थाच्या केलेल्या कारवाईचा तक्ता 

  Jan 23 - Dec 23     Jan 24 to May 24
  KG GM MLG Amount     KG GM MLG Amount
मेथ्यॅक्युलॉन 7 429 482 59652760            
गांजा 53 685 0 846931   गांजा 213 393 0 4324820
कोडाईन सिरप  0 0 1274 Bottle 208333            
एलएसडी पेपर 0 3 63 1980750   एलएसडी पेपर 0 3 116 3060000
चरस 3 645 0 1540000   चरस 1 856   5568000
एम्फेटामाईन  0 596 0 2384000            
निट्राझीपम टॅबलेट  & अल्प्राझोलम टॅबलेट 0 0 14 Strips 7692            
एमडीएमए  0 221 0 2210000   एमडीएमए ECSTACY   111 0 1838000
MD  मेफेड्रॉन 8 909 9 93334900   MD  मेफेड्रॉन 1 712 947 18393780
हेरॉईन  0 5 83 33160   हेरॉईन 0 54 26 813900
ब्राऊन शुगर 0 76 17 178920   ब्राऊन शुगर 0 298 0 2980000
कोकेन 1 54 0 12520000   कोकेन 3 751 0 37520000
ट्रमेडोल टॅबलेट्स 182 100 0 36440000   मेथेड्रॉन 0 55 0 55000
एकूण NDPS       211337446   एकूण  NDPS       74553500
                     
                     
  Jan 23 - Dec 23     Jan 24 to May 24
  No. Cases Accused         No. Cases
Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

मुख्यमंत्री शिंदे यांचे अनधिकृत बार, ढाबे, गुटखा पार्लरवर कारवाईचे आदेश