ठाणे जिल्ह्यात ७४६ ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदारांचे गृहमतदान
ठाणे: ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात गृहमतदानास ९ नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे. गेल्या तीन दिवसांत १८ विधानसभा मतदारसंघातील १२ मतदारसंघात ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांचे गृहमतदान पार पडले. या गृहमतदानात एकूण ७४६ नागरिकांनी गृहमतदानाच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार बजावला.
९ नोव्हेंबरपासून गृहमतदानास सुरुवात झाली असून १७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत गृहमतदान सुरु राहणार आहे. ९ ते ११ नोव्हेंबर या तीन दिवसात १३४-भिवंडी ग्रामीण, १३५-शहापूर अ.ज, १३८-कल्याण पश्चिम, १३९-मुरबाड, १४०-अंबरनाथ, १४१-उल्हासनगर, १४२-कल्याण पूर्व, १४३-डोंबिवली, १४६-ओवळा माजिवडा, १४७-कोपरी पाचपाखाडी, १४८-ठाणे तर १४९-कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात गृहमतदान पार पडले. या गृहमतदानास ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांचा आणि दिव्यांग मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून जे मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही, अशांसाठी ‘निवडणूक आयोग'ने गृहमतदानाची सोय केल्याबद्दल अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.
विधानसभा क्षेत्र ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक दिव्यांग मतदार
१३४-भिवंडी ग्रामीण ७८ ०२
१३५-शहापूर अ.ज. ५५ ०८
१३८-कल्याण पश्चिम ४३ ०२
१३९-मुरबाड ५८ ०२
१४०-अंबरनाथ ५६ २२
१४१-उल्हासनगर २४ ०७
१४२-कल्याण पूर्व ५९ १२
१४३-डोंबिवली ७८ ०२
१४६-ओवळा माजिवडा ४३ १८
१४७-कोपरी पाचपाखाडी ३६ ०५
१४८-ठाणे १११ ०४
१४९-कळवा मुंब्रा १० ११