लॉटरी पध्दतीने महिला बचत गटांना स्टॉलचे वितरण
उल्हासनगर : दीर्घकाळच्या संघर्षानंतर आणि आंदोलनानंतर उल्हासनगर शहरातील बचत गटातील गोरगरीब महिलांना महापालिकेच्या वतीने व्यवसाय करण्यासाठी लोखंडी स्टॉलचे वितरण करण्यात आले आहे. महापालिकेने स्टॉल वितरणास केलेल्या दिरंगाईमुळे संतापलेल्या महिला वर्गाने अनेक आंदोलने केली होती. अखेर प्रशासनाला मुहूर्त सापडला असून, लॉटरी पध्दतीने जवळपास ५० महिला बचत गटांना स्टॉल देण्यात आले आहेत.
महापालिकेने महिला बचत गटांना व्यवसायाच्या दृष्टीने लोखंडी स्टॉल तयार केले होते. मात्र, सदर स्टॉल वितरित न करता विविध ठिकाणी धुळखात पडले होते. यामुळे महिलांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता आणि त्यांनी स्टॉल वितरणाची मागणी लावून धरली होती.
आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या निर्देशानुसार, महिला बचत गटांना स्टॉल वाटप करण्याची प्रक्रिया सुरु झाली. डॉ. किशोर गवस (अतिरिक्त आयुक्त), अनंत जवादवार (उपायुक्त, म.बा.क.) आणि गणेश पवार (विभागप्रमुख, म.बा.क.) यांनी स्टॉल वाटपासाठी ६ नोव्हेंबर रोजी महापालिका सभागृहात कार्यक्रम आयोजित केला. सदर स्टॉल लॉटरी पध्दतीने वितरीत करण्यात आले. कॅम्प क्र.१, २, ३ आणि कॅम्प क्र.४, ५ अशाप्रकारे महिलांना जवळचे ठिकाण मिळावे या उद्देशाने दोन स्वतंत्र डब्यांमध्ये चि्ी्या ठेवण्यात आल्या होत्या.
महिला बचत गटाचे नाव आणि स्टॉलचे ठिकाण अशा दोन चि्ी्या एकाच वेळी काढण्यासाठी दोन शाळकरी मुलींना बोलावण्यात आले होते.सर्व महिला बचत गटाच्या अध्यक्षांच्या समक्ष चि्ी्या काढून ५० महिला बचत गटांना स्टॉलचे वाटप करण्यात आले. लॉटरी पद्धतीने स्टॉल वाटप कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर आनंदित झालेल्या महिलांनी आयुक्त मनिषा आव्हाळे यांचे विशेष आभार मानले.