३० वर्ष जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेण्याचे आवाहन
खारघर मधील भूखंडाला सर्वाधिक बोली
नवी मुंबई : दिवसेंदिवस जागांचे भाव गगनाला भिडत आहेत. नवी मुंबईतही गेल्या काही वर्षांपासून ‘सिडको'च्या भूखंडांना अव्वाच्या सव्वा दर मिळत आहे. बांधकाम विकासकांनी नवी मुंबईतील सानपाडा, नेरुळ, घणसोली, ऐरोली, बेलापूर, खारघर, पनवेल, कामोठे, उलवे परिसराकडे लक्ष्य केंद्रित केले आहे. त्यातच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे शहराला अधिकच महत्व प्राप्त झाले असल्याने आता खारघर विकासकांसाठी पुढील सर्वात मोठे रिअल इस्टेट डेस्टिनेशन असल्याचे दिसून येत आहे. ‘सिडको'च्या नुकत्याच झालेल्या लिलावात खारघर, सेवटर-२३ मधील सेंट्रल पार्क परिसरातील भूखंड क्र.८ वरील ४१९९४ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाला जवळपास २००० कोटींपेक्षा मूल्य (बोली ५,०६,००१ रुपये प्रति चौ.मी.) मिळाले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील सर्वाधिक मागणी असलेल्या प्रॉपर्टी डेस्टिनेशनपैकी एक म्हणून खारघर उपनगराकडे बघितले जात आहे.
दरम्यान, २५ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या ‘सिडको'च्या भूखंड लिलाव प्रक्रियेत खारघर, सेक्टर-६ मधील भूखंड क्र.१५ (क्षेत्रफळ ३००१.०३ चौरस मीटर) या भूखंडाला अभिनंदन बिल्डर्सने सर्वाधिक ७.३५ लाख रुपयांची विक्रमी बोली लावली होती. त्यावेळी खारघर मधील सदर भूखंडाची एकूण किंमत २२० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती.
‘सिडको'च्या मार्वेÀटींग विभागाच्या वतीने खारघर, सेवटर-२३ मधील प्लॉट क्र.८ (४१,९९४ चौ.मी.) या भूखंड विक्रीसाठी ऑनलाईन लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. रेसिडेन्शियल आणि कमर्शिअल असलेल्या या भूखंडासाठी ‘सिडको'तर्फे ३५१००१.०० रुपये अशी आधारभूत किंमत निश्चित करण्यात आली होती. त्यासाठी १.५ एफएसआय देखील दिला जाणार आहे. सदर भूखंडासाठी एकूण ८ बोलीदारांनी सहभाग घेतला होता, त्यांनी ३.६० लाख रुपयांपेक्षा जास्त बोली लावल्या. यात आकार ॲस्ट्रोन कंपनीने बाजी मारली. ‘आकार ॲस्ट्रोन'ने ५,०६,००१ रुपये बोली लावल्याने सदर भूखंडासाठी जवळपास २१२४.९० कोटी रुपये किंमत ‘सिडको'ला मिळणार आहे. सदर भूखंड लिलाव प्रक्रियेत आकार पाठोपाठ नोबेल ऑर्गेनिवस प्रा. लि. (५,०५,००१ रुपये), लोढा डेव्हलपर्स लि. (५,००,००१ रुपये) आणि फाल्कन लॅन्डस् प्रा. लि. (४,१४,४१४ रुपये) यांनी बोली लावली.
जवळच मेट्रो लाईन, गोल्फ कोर्स, इस्कॉन मंदिर असलेल्या ‘सेंट्रल पार्क'च्या सर्व्हिस रोडने वेढलेला सदर भूखंड खारघरमधील सर्वात प्रीमियम जमिनींपैकी एक मानला जातो. त्यामुळे या भूखंडाचा आकार आणि स्थान पाहता, तज्ञांना क्लबहाऊस, स्विमिंग पुल, जिमखाना, लँडस्केप गार्डन्स, वॉकिंग ट्रॅक आणि इतर आधुनिक सुविधांसह एक ऐतिहासिक निवासी आणि व्यावसायिक विकास अपेक्षित आहे.
दुसरीकडे ‘सिडको'च्या लिलावाच्या निकालांमध्ये खारघर, घणसोली आणि कळंबोली मधील ८ भूखंडांचा समावेश आहे. खारघर, सेक्टर-८ मधील ४,०५० चौरस मीटर (प्लॉट क्रमांक १६अ) क्षेत्रफळाच्या आणखी एका भूखंडाला अरोरा युनिव्हर्सल रिॲलिटीकडून ४.५१ लाख रुपये प्रति चौरस मीटर दराने बोली लावण्यात आली आहे.
जागांचे गगनाला भिडणारे दर आणि बांधकाम व्यावसायिकांमधील स्पर्धा बघता यापूर्वी देखील ‘सिडको'तर्फे ऐरोली, द्रोणागिरी, घणसोली, खारघर, कोपरखैरणे, नेरुळ, पुष्पक आणि सानपाडा येथील विविध नोडस्साठी योजना अंतर्गत एकूण भूखंडांचा लिलाव जाहीर केला गेला. यामध्ये शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी या जमिनींसाठी उच्च दराच्या बोली लावल्या आहेत. तर दुसरीकडे शहरातील काही बिल्डर्स आणि वास्तुविशारदांनी बांधकाम व्यावसायिकांनी लावलेल्या बोली अवास्तव असून एकंदरीतच त्याने घरांच्या किंमतींमध्ये वाढ होण्याचा दावा केला आहे.