रेजिंग डे सप्ताह निमित्ताने तुर्भे स्टोअर येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
नवी मुंबई ; नवी मुंबई महापालिका संचालित माध्यमिक शाळा क्र १११ तुर्भे स्टोअर येथे इ. आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लहान मुलांसंदर्भात होणारे गुन्हे, सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची काळजी, वाहतुकीचे नियम, अंमली पदार्थ विरोधी कायदे याबाबत रेजिंग डे सप्ताहांतर्गत माहिती ६ जानेवारी रोजी करून देण्यात आली. पोलीसांकडील सुरक्षा साधनांची ओळख करून दिली तसेच पोलीस हेल्पलाइन नंबर, डायल ११२, सायबर सुरक्षा हेल्पलाइन नंबर १९३०, नवी मुंबई पोलीस व्हाट्सअप चॅनल, नवी मुंबई पोलीस यूट्यूब चॅनल याबाबत माहिती देऊन पाठपुरावा करण्याबाबत सूचना केल्या.
यावेळी वेळी पोलीस उपनिरीक्षक महेंद्रसिंग डोके, पोलीस उपनिरीक्षक किरण वाघ, सपोनि महेश जानकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रताप दरगुडे व महिला पोलीस कॉन्स्टेबल भाग्यश्री वाघ यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि सुमारे १६५ विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.