५ व्या ज्युनियर जागतिक पिंंच्याक सिलाट स्पर्धेत महाराष्ट्रातील १५ खेळाडू

नवी मुंबई : दुबई अबुधाबी येथे ५वी ज्युनियर जागतिक पिंच्याक सिलॅट स्पर्धा व २० वी वरिष्ठ वयोगट जागतिक पिंच्याक सिलॅट स्पर्धा १८ ते २२ डिसेंबर दरम्यान ADNEC हॉल, अबू धाबी येथे पार पडत असून या स्पर्धेसाठी ४४ देशातून सहभागी होणाऱ्या खेळाडूंमध्ये भारतातील १२० जण सहभागी झालेले आहेत व भारताच्या संघामध्ये महाराष्ट्रातील १५ खेळाडूंची निवड ह्या जागतिक स्पर्धेसाठी झालेली आहे. यातील १३ खेळाडू नवी मुंबईकर आहेत.

पिंच्याक सिलॅट हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्ट खेळ प्रकार असून (१) टँडिंग फाईट) (२)तुंगल(क) (३) रेगु (ग्रुप काता) (४) गंडा (डेमो फाईट) (५)सोलो (क्रिएटिविटी) या पाच प्रकारात खेळला जातो. १ सप्टेंबर २०२० पासून या खेळाचा समावेश भारतीय क्रिडा मंत्रालय, भारत सरकार यांनी आपल्या ५ज्ञ्र् राखिव नोकर भरतीमध्ये केला आहे. या खेळाला युवक कल्याण आणि क्रिडा मंत्रालय भारत सरकार, भारतीय विश्वविद्यालय संघ अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड ऑलिम्पिक कांऊसिल ऑफ एशियाची मान्यता आहे. हा खेळ एशियन गेम, एशियन मार्शल आर्ट्‌सगेम एशियन यूथ गेम व एशियन बीच  गेम, भारतीय विश्वविद्यालय खेळ अशा ऑफिशियल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा मध्ये खेळला जातो. या खेळाचा समावेश गोव्यामध्ये झालेल्या ३७ व्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये १४ मे २०२३ रोजी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने केला होता. त्यामध्ये  महाराष्ट्र संघाने २१ पदके मिळवली होती. आतापर्यंत झालेल्या १९ जागतिक स्पर्धांमधून भारतीय संघ ७ व्या क्रमांकावर आहे

भारतीय संघातील खेळाडू पुढीलप्रमाणे : शिवतेज दिनेश पाटील वरद उमेश शेट्ये अर्णव सचिन गवई प्रथमेश दत्तू दातीर रामचंद्र दीपक बदक सोमनाथ सहदेव सोनवणे वैभव वाल्मिक काळे कृष्णा नर्सिंग पांचाळ ओमकार गणेश अभंगपियुष अभय शुक्ला हर्षवर्धन अनंत भोसले रिया राजेश चव्हाणप्राजक्ता प्रभाकर जाधव भक्ती शिवाजी किल्लेदार जयश्री कैलास शेट्ये आणि प्रशिक्षक किशोर प्रकाश येवले. सर्व खेळाडूना इंडियन पिंच्याक सिलॅटचे अध्यक्ष किशोर प्रकाश येवले चेअरमन मोहम्मद इक्बाल व कोच इरफान अजीज बुटा व महाराष्ट्र पिंच्याक सिलॅटचे अध्यक्ष सुरेंद्रप्रताप सिंह खजिनदार मुकेश सोनवणे व महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट चे सर्व सदस्य ह्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न