भारताला तिसरे ऑलिम्पिक पदक

मुंबई : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे. कोल्हापूरचा नेमबाज स्वप्निल कुसाळे याने ५० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदक पटकावले आहे. भारताला मिळालेले सदरचे तिसरे पदक आहे.

५० मीटर रायफल ३ पोझिशन शुटींगच्या अंतिम सामन्यात स्वप्निल कुसाळे याने ४५१.४ गुण मिळवून कांस्यपदक मिळवलं आहे. या स्पर्धेत चीनचा वाय. के. ल्यू. याने ४६३.६ गुणांसह सुवर्ण पदक तर युक्रेनच्या एस. कुलीश ४६१.३ गुणांसह रजत पदक पटकावले.      

५० मीटर रायफल थ्री पोजिशन प्रकार कठीण मानला जातो. या प्रकारामध्ये नेमबाजांना ३ वेगवेगळ्या पोजिशन्सवरुन नेम साधायचा असतो. ख्हात्त्ग्हु (गुडघ्यावर बसून नेम), झ्ीदहा (झोपून) आणि एूीह्‌ग्हु (उभे राहून) या तीन प्रकारात नेम साधला जातो. त्यामुळे प्रत्येक प्रकारात आपले लक्ष्य विचलीत न होऊ देता योग्य नेम साधणे नेमबाजांसाठी आव्हानात्मक असते. स्वप्निल पदकाच्या फेरीमध्ये सुरुवातीला ५-६ व्या स्थानावर वर-खाली करत होता. परंतु, मोक्याच्या क्षणी त्याने जिरी प्रिव्रात्स्की आणि जॉन हर्मन या दोन प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले.

स्वप्नील कुसाळे याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन...

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात देशाला कांस्य पदक जिंकून देणारा महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याचे उपमुख्यमंत्री तथा ‘महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना'चे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. कोल्हापूरच्या मातीतल्या या सुपुत्राने महाराष्ट्राचा गौरव वाढवला असून राज्याच्या क्रीडाक्षेत्राला नवे चैतन्य, ऊर्जा दिली आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी स्वप्नील कुसाळे याचे अभिनंदन केले आहे.

कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर तब्बल ७२ वर्षांनी महाराष्ट्रीयन खेळाडूला मिळालेल्या वैयक्तिक पदकाचा आनंद अवर्णनीय आहे, असेही अजित पवार म्हणाले म्हणाले.

कोल्हापूर जवळच्या कांबळवाडी गावातील स्वप्नीलने भारताला पॅरिस ऑलिंपिकमध्ये तिसरे पदक मिळवून दिल्याचा महाराष्ट्रासह देशाला अभिमान वाटत आहे. इयत्ता सातवीत असताना त्याची ‘क्रीडा प्रबोधिनी'साठी निवड झाली होती. भोसला मिलिटरी स्कूल मध्येही त्याने सराव सुरु ठेवला होता. प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी आणि क्रीडा प्रबोधिनीतील प्रशिक्षणाच्या जोरावर स्वप्नील याने ऐतिहासिक कामगिरी करुन आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा गौरव वाढविला आहे, अशी भावनाही व्यक्त केली. 

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न