देवभूमी केरळमधील होडी वल्हवण्याची स्पर्धा...देवांची जणू जलक्रीडाच
केरळची पारंपरिक होडी वल्हवण्याची स्पर्धा अजूनही पारंपारिकच आहे. केरळची शान आहे. समुद्र क्रिडेचा मान आहे. देवभूमी केरळच्या देवांची ती जणू जलक्रीडाच आहे. पूर्वी केरळातील मल्याळी लोकांचा उत्सव असलेली ही बोटींची शर्यत आता पुन्हा देशात प्रसिद्ध आहे. इतर राज्यातील लोकसुद्धा हल्ली या शर्यतीत भाग घेतात.
केरळ सहल ही सर्वाधीक लोकप्रिय सहल आहे. सर्पबोट, सर्प होडी, ही केरळातील आवडती व लोकप्रिय इव्हेंट आहे. ८/८/२०१५ रोजी चुंदन वल्लम नावाने ओळखल्या जाणाऱ्या सर्प बोटीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेलं असते. १२८ फूट लांब अशी जवाहर थायंकारी याची बोट १२५० मीटरच्या शर्यतीती जिंकली होती, हे यानंतर सर्प बोटीने ४.३६ मिनिटात पार पडले. अल्ला पुझा येथेही शर्यत पार पडली व विजेत्याला नेहरू ट्रॉफी दिली.
पूर्वी केरळातील मल्याळी लोकांचा उत्सव असलेली ही बोटींची शर्यत आता पुन्हा देशात प्रसिद्ध आहे. इतर राज्यातील लोकसुद्धा हल्ली या शर्यतीत भाग घेतात. हल्ली बोट क्लबमध्ये बोटी वल्हवणे ‘नावाडी' शिक्षण दिले होते. मात्र प्रशिक्षित नावाडी कला शिक्षकांची कमतरता हल्ली केरळला जाणवते आहे. ५०० किमी एवढा लांब पसरलेला किनारा लाभलेल्या केरळला देवभूमी म्हणतात.
तोंडाने ‘थी थरा थाई' असा आवाज करत पूर्वी मल्याळी लोक या सर्प होड्या वल्हवित असत. आता परप्रांतीयांचे आक्रमण झाल्याने आणि तेव्हाच प्रमाणात स्थलबतार झाल्यामुळे एक दोन तीन अशी सोप्पी आरोळी नाव वल्हवताना सर्व नाविकांचा ताल जमावा म्हणून दिली जाते. बोट वल्हवताना बोट चालवणाऱ्या नाविकांना स्फुरण चढावे म्हणून ढोल वाजवणारे व स्पुर्ती गान गाणारे दोन होळकरी बोटीवर उभे असतात. त्या ढोल वादनात लय असते. गाण्यांना व वल्हवणाऱ्यांना ताल असतो. ग्रामीण व फक्त केरळी असा तडका, स्वाद असलेल्या या सर्प होडी स्पर्धेत आता पारंपरिक शब्द आला आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या स्पर्धाना आता प्रायोजक मिळतात. जिंकणाऱ्यांसाठी आकर्षक बक्षीस दिली जातात. मात्र सर्व पारंपारिक गोष्टींना पडणाऱ्या संकटाप्रमाणे या बोट वल्हवण्यावर संकट आहेत आधुनिकतेचे, सिनेमा मोबाईल इंटरनेटच्या विळख्याचे, यांत्रिकीकरणामुळे हल्ली नाविक मोटार बोटी वापरतात. खोल समुद्रात मासेमारीसाठी होडी वल्हवण्यापेक्षा मोटारबोटीने जाणे खूपच सोपे आहे. त्यामुळे कोळी लोकांना सवय व सराव उरलेला नाही. वेंबनाड तलावाच्या चहू बाजूनं राहणाऱ्या १३ खेड्यातील रहिवाशांना पूर्वी वंची, छोटी होडी चालवणे आवश्यक होते. (हा तलाव मुंबई शहराच्या तिप्पट रुंदीत पसरलेला आहे) वंचितच केरळवासी खरेदी, मासेमारी नातेवाईकांना भेटणे, या कामासाठी जातात. वल्ह्यांनी वल्हवणाऱ्याची त्या काळी कमतरता नव्हती. आता परिस्थिती वेगळी आहे. नोकरदारांचे संख्या वाढली आहे. मासेमारी यंत्राधिष्टित झाली आहे. कै. पंडित जवाहरलाल नेहरूजी १९५२ साली जेव्हा केरळला अल्लापुझा येथे भेट दिली तेव्हा वेंबनाड तलावाच्या विस्तीर्ण जलाशयाच्या त्यातील नावानी, निसर्ग सौदर्य, बदक यामुळे ते खूप खुश झाले. ‘तबियत खुश' अशा मूडमध्ये त्यांना स्वागतोत्सुक अशा बोटीत त्यांनी उडी मारून प्रवेश केला. अशी कथा बुजुर्गांकडून ऐकायला मिळते. अशा चुंदन वेल्लमाची ओढ अनेक पर्यटकांना आजही आकर्षित करते.
पंडित नेहरूंनीच स्थानिक संस्कृती उत्सव म्हणून बोट रेस, वार्षिक उत्सव सुरु करावा असे सुचवले होते. वेंबनाड तलावाभोवतीच्या सर्व स्थानिकांनी पैसे जमवून सर्प होड्या खरेदी केल्या आणि स्पर्धेसाठी वल्हवणारे स्पर्धक प्रशिक्षित केले. समाजात ह्या सर्प होडी स्पर्धेत भाग घेण्याऱ्यांना मान होता. अनेक ख्रिश्चन, केरळी नायर कुटुंबे व स्थानिक समाज बोट स्पर्धेत रस घेत असत.
हिरव्यागार केरळच्या कुमारकोम-कोल्लम किनारपट्टीवरील बोट क्लबमधील खेळाडू व नाविकांना या स्पर्धेमुळे वाव मिळत असे. ही सर्व स्पर्धा पारंपरिक होती व त्यात भावनेचा ओलावा होता. चांगले नाविक त्याकाळी (१९७०-१९८०) जनमानसावर राज्य करीत होते. काही चित्रपटात या सर्प बोटीचा तर काही लोकगीतांमध्ये सुद्धा ‘वल्हव रे कोळ्या वल्हव रे नाकातील नथनी देते तुला रे, घरी जायला उशीर झाला, वल्हव रे नाखवा वल्हव भराभरा' असा उल्लेख आहे. बोट रेसची शान अजूनही अवर्णनीय आहे. मूलतः स्थानिक..पण एनआयआर लोक हल्ली यातील काही स्पर्धकांना प्रायोजित करतात. जुन्या छोट्या चुंदन वल्लम आता आधुनिक झाल्या आहेत. श्रीमंत मालकांकडे काही चुंदन वल्लम (सर्प होडी) ची मालकी गेली आहे. तरीही केरळची पारंपरिक ही होडी वल्हवण्याची स्पर्धा अजूनही पारंपारिकच आहे. केरळची शान आहे. समुद्र क्रिडेचा मान आहे. देवभूमी केरळच्या देवांची ती जणू जलक्रीडाच आहे. पूजाच आहे. -शुभांगी पासेबंद