अडिवळी-ढोकळी, पिसवली परिसरातील अनधिकृत पाणी लाईन अधिकृत करण्याची मागणी
कल्याण : अडिवळी-ढोकळी आणि पिसवली परिसरात असलेल्या चाळ आणि इमारतीमध्ये अनधिकृत पाणी लाईन असून या नागरिकांकडून पाणी माफिया अनधिकृतपणे पाणीपट्टी वसूल करीत आहेत. त्यामुळे या अनधिकृत पाणी लाईन अधिकृत करुन या नागरिकांकडून महापालिकेनेच पाणीपट्टी वसूल करण्याची मागणी ‘भाजपा'चे कल्याण ग्रामीण मंडळ-२ चे चिटणीस संदीप क्षीरसागर आणि महिला उपाध्यक्षा सोनी क्षीरसागर यांनी केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे. याबाबत त्यांनी केडीएमसी उपायुक्त कांचन गायकवाड यांची भेट घेत निवेदन दिले आहे.
गेल्या १० वर्षोंपासून अडिवळी-ढोकळी आणि पिसवली मधील हजारो चाळी आणि कमीत कमी ५०० किंवा त्याहुन अधिक इमारतीमध्ये पाण्याच्या पाण्याचे अनधिकृत देणाऱ्या पाण्याच्या पाण्याची लाईन आहे. सदर चाळीवर इमारतीच्या पाण्याचा महसूल (पाणी माफीया) दर महा वसूल करीत आहे. जेव्हा जेव्हा विकासाचे मुद्दे ‘केडीएमसी'कडे घेऊन येतो, तेव्हा ‘केडीएमसी'कडे निधीची कमतरता असल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगत असतात.
अडिवळी-ढोकळी आणि पिसवली मधील चाळी, कमीत कमी ५०० किंवा त्याहुन अधिक इमारती मधील अनधिकृत पाण्याची लाईन अधिकृत करण्यात यावी. त्यांच्याकडून अधिकृतपणे (पाणी बिल) महसूल आकारण्यात यावा आणि या महसूलाच्या रक्कमेतून अडिवळी-ढोकळी आणि पिसवली परिसरातील रस्ते, गटार कामाचा विकास करण्यात यावा, अशी मागणी क्षीरसागर यांनी केली आहे.