आगामी निवडणुकीत ‘मविआ'च्या विजयामध्ये ‘युवा सेना'चा महत्वाचा वाटा - अनंत गीते

पनवेल : येणाऱ्या महापालिका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ‘महाविकास आघाडी'च्या विजयामध्ये ‘युवा सेना'चा महत्वाचा वाटा असेल, असे प्रतिपादन शिवसेना नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी युवा सेना पनवेल विधानसभा पदाधिकारी मेळावामध्ये मार्गदर्शन करताना केले.  

अनंत गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा सेना जिल्हा अधिकारी पराग मोहिते यांच्या नेतृत्वाखाली ‘युवा सेना'तर्फे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. निवडणुकांची तयारी, उमेदवारांचा प्रचार-प्रसार, ‘युवा सेना'चा विस्तार, मतदारयादी संदर्भातील छाननी तसेच मतदार जागरुकता आदि विषयांवर शिवसेना नेते अनंत गीते, शिवसेना उपनेते बबनदादा पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत आणि जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला आदिंनी विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच यावेळी ‘युवा सेना'च्या प्रमुख नियुक्त्या सुध्दा करण्यात आल्या.

सदर मेळाव्याला सह-संपर्कप्रमुख अनिल चव्हाण, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगरप्रमुख अवचित राऊत, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर बडे, शहरप्रमुख प्रवीण जाधव, यतिन देशमुख, सदानंद शिर्के, रामदास गोवारी, प्रदीप केनी, माजी नगरसेवक अतुल पालन, संतोष गोळे, उपशहर संघटिका उज्वला गावडे, अश्विनी देसाई, शाखाप्रमुख मयुरेश पाटील, उपजिल्हाधिकारी नितीन पाटील, विधानसभा समन्वयक अरविंद कडव, महानगर चिटणीस जीवन पाटील, तालुका चिटणीस सूरज गायकर, ‘युवती सेना'च्या काजोल व्हरकटे, लीना खडकबाण यांच्यासह  यांच्यासह शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना यांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे