निसर्गप्रेमी हितेंद्र घरत यांच्याकडून १० लाख बियांचे रोपण  

खारघर फणसवाडी येथील डोंगरावर मान्यवरांच्या उपस्थितीत १० लाख बीजांचे रोपण

उरण : निसर्ग प्रेमी आणि गडप्रेमी असणारे सिडको अधिकारी हितेंद्र घरत वेगवेगळ्या डोंगरावर गेली २५ वर्षे बिजरोपण करीत आले आहेत. यंदा २६ व्या वर्षी खारघर फणसवाडी येथील डोंगरावर मान्यवरांच्या उपस्थितीत १० लाख बीजांचे रोपण करण्यात आले.    

आपल्या देशात आणि राज्यात वाढत्या औद्योगिकारणामुळे निसर्ग लोप पावत चालला आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच सोसावे लागत आहे. यासाठी झाडे लावणे गरजेचे आहे. सदरचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उरण मधील निसर्गप्रेमी हितेंद्र घरत गेली २५ वर्षे फळांच्या हजारो बिया गोळा करुन त्या पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला अथवा किल्ले-रानावनात टाकत आहेत. त्यातील शेकडोंच्या संख्येने झाडे जगून याचा फायदा तुम्हा-आम्हाला, प्राण्यांना होऊन त्याद्वारे निसर्गाचीही जपवणूक करण्याचा घरत यांचा स्तुत्य उपक्रम सुरू आहे. त्यांच्या सदर उपक्रमाचे इतरांनी अनुकरण करणे गरजेचे आहे.

हितेंद्र घरत आणि त्यांचे कुटुंबिय इतरांनी खाल्लेल्या फळ बिया घरी आणून त्या धुवून, सुकवून आवषधिकरण करुन  ठेवतात. अशा प्रकारे १० लाख बियांची साठवणूक करुन त्याचे २ जुलै रोजी खारघर येथील फणसवाडी डोंगरावर रोपण करण्यात आले. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी हितेंद्र घरत, त्यांची पत्नी, मुले तसेच अभिनेत्री पुजा, अभिनेते कुणाल मेश्राम, आचार्य ज्योतीषार्य मनमोहन, फोरेस्ट मुंबई विभाग चीफ मॅनेजर सौ. बिरारी, फोरेस्ट झोन मॅनेजर नवी मुंबई बिरारी, समाजसेवक ज्ञानेश्वर सोनावणे, डॉ. साठे, ‘सिडको'चे आर्कटिेवट सचिन माथनकर, आशिष चव्हाण, ‘सिडको कर्मचारी युनियन'चे जनरल सेक्रेटरी जे. टी. पाटील, जॉईंट सेक्रेटरी सुभाष पाटील, ‘उरण तालुका मराठी पत्रकार संघ'चे अध्यक्ष घनश्याम कडू, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र माळी, निवृत्त पोलीस अधिकारी अरविंद संखे, रामचंद्र राऊत, सेवानिवृत्त मरीन ब्लॅक कॅट कमांडो रवी कुलकर्णी, अशोक कुमार शर्मा, भूषण शर्मा, जेष्ठ समाजसेवक परशुराम रघुनाथ पाटील, आदिंसह इतर मान्यवर उपस्थित होते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘नैना बिल्डर असोशिएशन'तर्फे नवीन योजना सादर