‘रुनवाल रिअल्टी ठाणे हाफ मॅरेथॉन'मध्ये ३ हजार धावपटुंचा सहभाग

ठाणे : रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक रुनवाल रिअल्टी यांनी प्लेफ्री स्पोर्टस्‌ इंडिया यांच्या सहकार्याने ‘ठाणे हाफ मॅरेथॉन'च्या तिसऱ्या पर्वाचे आयोजन रनवाल-२५ आवर्स लाइफ, मानपाडा येथे मोठ्या उत्साहात केले.

ब्रेकिंग बॅरियर्स, बिल्डिंग चॅम्पियन या थीमवर वर आधारित सदर स्पर्धेमध्ये २१ कि.मी., १० कि.मी. आणि ५ कि.मी. मजेत धावण्याचा तसेच १ कि.मी. कौटुंबिक धाव अशा शर्यतींचा समावेश होता. यावेळी ३ हजारहून अधिक धावपटू आणि ३० पॅरा-ॲथलिटस्‌ यांनी आरोग्य, समावेशकता आणि सकारात्मक बदल या सामुहिक ध्येयासाठी एकत्र येत स्पर्धेत सहभाग नोंदवला. 

चिकाटीचा उत्सव साजरा करण्याबरोबरच, मॅरेथॉन सामाजिक उद्दिष्टाचे प्रतिक ठरली. या कार्यक्रमातून मिळणारा संपूर्ण निधी भारतातील पॅरा-ॲथलेटिक चॅम्पियन्सना कृत्रिम पाय उपलब्ध करुन देण्यासाठी वापरण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे रुनवाल रिअल्टीने जिद्द, सामर्थ्य आणि सकारात्मक बदल घडवण्याची आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे. ‘ह्युमेबल फाऊंंडेशन'च्या पाठिंब्यामुळे या कार्यक्रमाचे योगदान अधिक व्यापक झाले असून, समाज अधिक समावेशक करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले.

या मॅरेथॉनमधील धावपटुंना उच्च दर्जाचे ड्राय फिट टी-शर्टस्‌, फिनिशर मेडल्स, स्वादिष्ट नाश्ता आणि १००० रुपये किंमतीचे वुÀपन्स मिळाले. विजेत्यांना ट्रॉफी, खास भेटवस्तू आणि विशेष कूपन्स देऊन गौरविण्यात आले.

सर्व श्रेणींमध्ये ३००० हून अधिक सहभागी; त्यात १२०० महिला, ३०० ज्येष्ठ नागरिक आणि २७० मुलांनी शर्यत पूर्ण केली. स्पर्धेच्या माध्यमातून जमा झालेला निधी पॅरा-ॲथलिटस्‌ना कृत्रिम पाय देण्यासाठी वापरला जाईल.

Read Previous

शिवसेना उरण ने जपली सामाजिक बांधिलकी

Read Next

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय महिला टेनिस स्पर्धेची आज सेमी फायनल