नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय महिला टेनिस स्पर्धेची आज सेमी फायनल
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला टेनिस स्पर्धा वाशी मधील नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशनच्या टेनिस कोर्टवर सुरु झाली आहे. या स्पर्धेचे आयोजन ‘नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन'च्या (एनएमएसए) वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेत ५७ महिला खेळाडूंनी भाग घेतला आहे. यामध्ये २७ आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू तसेच ३० भारतीय महिला खेळाडू यांचा सहभाग आहे.
यंदा या स्पर्धेचे ११ वे वर्ष असून विजेत्या स्पर्धकांना ४०००० डॉलर्स रवकमेची बक्षीसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय टेनिस मध्ये मानांकन असलेल्या महिला खेळाडू रशिया, इंडोनेशिया, जपान, कझाकिस्तान, फ्रान्स, फिनलँड, ग्रीस, थायलंड, चीन, पोलंड, इजराइल, लनीवा येथून नवी मुंबईत दाखल झाल्या आहेत.
तसेच भारताच्या मानांकन असलेल्या महिला खेळाडू अंकिता रैना सह ३० महिला खेळाडुंंनी देखील सहभाग घेतला आहे.
आज २१ डिसेंबर रोजी या स्पर्धेत सिंगलसाठी सेमी फायनल होणार आहे. सेमी फायनल लढत फनग्रन टियान (चीन), थासापार्क निकलो (थायलंड), एकटेरीना रेनगोल्ड (रशिया), प्रिसका गुगरहो (इंडोनेशिया) या चार स्पर्धकांमध्ये होणार आहे. तर डबलची फायनल भारताच्या रिया भाटिया, झील देसाई विरुध्द कनाको मोरीसकी, नाहो सनो (जपान) यांच्यामध्ये होणार आहे. टेनिस सिंगल स्पर्धेची फायनल उद्या २२ डिसेंबर रोजी दुपारी होणार आहे.
दरम्यान, सदर स्पर्धेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय महिला टेनिस खेळाडू तसेच भारतीय महिला टेनिस खेळाडू यांचा खेळ पाहण्याची नवी मुंबईकरांना सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.
तर स्पर्धेसाठी बाहेरुन निधी जमा करण्यात येत असून थोड्या प्रमाणात ‘वलब'चे पैसे वापरले जात असल्याची माहिती ‘आयटीएफ स्पर्धा'चे संचालक तथा ‘नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन'चे उपाध्यक्ष डॉ. दिलीप राणे यांनी दिली.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ ‘असोसिएशन'चे अध्यक्ष तथा राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते होणार असल्याचे डॉ. दिलीप राणे यांनी सांगितले.