उरण नगरपरिषदचे मीनाताई ठाकरे वाचनालयातील अभ्यासिकेमध्ये उदंड प्रतिसाद

मीनाताई ठाकरे वाचनालयातील समजलेला विषय इतर विद्यार्थ्यांना समजावून सांगणे हा उपक्रम सुरू

उरण ः उरण नगरपरिषदचे मांॅसाहेब मिनाताई ठाकरे वाचनालय, उरण येथील अभ्यासिकेमध्ये नियमित येणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या सहकारी विद्यार्थ्यांना सहज आपल्याला उत्तम प्रकारे समजलेला विषय इतर विद्यार्थ्यांना समजावून सांगणे हा उपक्रम सुरू केले आहे. या उपक्रमाचे उद्‌घाटन ग्रंथपाल संतोष पवार यांनी केले. या उपक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्याला आवडत असलेला विषय एक ते दोन तास शिकवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे दर रविवारी एका विषयावर आधारित २५ प्रश्नांची प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी हि देखील त्या त्या विद्यार्थ्यांनी घ्ोतली त्याचीही सुरुवात  २ जुलै २०२३ रोजी पहिली गणित विषयाची पहिली चाचणी लेखी परिक्षा घेण्यात आली. ह्या उपक्रमाची सुरुवात करण्याचा मान सलोनी विलास कडू -सोनारी उरण हिला मिळाला आणि ह्या विद्यार्थ्यांनीने गणित-बुद्धिमत्ता हा विषय अगदी सहज समजेल या पद्धतीने शिकविण्याचा प्रयत्न केला. हया उपक्रमाचा स्वीकार सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे केला. ह्या व्याख्यानानंतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी आपले विषय आपापसात विभागून घेतले आणि अभ्यासिकेमध्ये अधिक प्रोत्साहनवर्धक वातावरण निर्माण झाले आहे. 

उरण नगरपरिषदचे माँसाहेब मीनाताई ठाकरे वाचनालय, अभ्यासिकेचे उद्‌घाटन प्रसंगी बोलताना ग्रंथपाल  संतोष पवार यांनी उपक्रमा संदर्भात आपले मत व्यक्त करताना अभ्यासिकेची संकल्पना महेंद्र कल्याणकर कोकण विभाग आयुक्त यांनी प्रथम मांडली, या व्याख्यानमालेत व्याख्यान देण्याचा पहिला मान सलोनी कडू हिला मिळाला या विद्यार्थ्यीनीचे आणि सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि सांगितले की आपल्या वाचनालयामध्ये विद्यार्थ्यांना अपेक्षित सुविधा जसे  उत्तम वातावरण तसेच स्पर्धा परीक्षेकरिता आवश्यक पुस्तके उपलब्ध करुन देणे ह्या करिता विशेष मार्गदर्शन व सहकार्य आपल्याला मुख्याधिकारी राहूल इंगळे यांचे लाभते आहे त्याचीच फलश्रुती हा उपक्रम आहे असे संतोष पवार यांनी मत व्यक्त केले. आज हया स्पर्धा परिक्षेबाबतचे वातावरण तयार होत असले बाबतचे समाधान व्यक्त करत असताना ह्याचे सातत्य विद्यार्थ्यांनी जपले पाहिजे ही विद्यार्थ्यांकडून अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात स्पर्धा परिक्षा द्यावयाच्या आहेत त्यांनी नक्कीच या संधीचा लाभ घ्यावा. तसेच ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासिकेमध्ये येणे शक्य होत नाही त्या विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळा महाविद्यालयात त्या - त्या ठिकाणी सदर उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहनही संतोष पवार यांनी यावेळी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथालयाचे सहाय्यक कर्मचारी जयेश वत्सराज यांनी मेहनत घेतली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

टोमॅटोचे उत्पादन घटल्याने वाशीतील घाऊक बाजारात आवक घटली