१५ खलाशांना वाचवणारा करंजातील युवक ठरला देवदूत

उरण: उरण तालुक्यातील करंजा पाडा येथील अतिश सदानंद कोळी आणि त्याच्या साथीदाराने आपल्या जीवाची बाजी लावून वादळात अडकलेल्या दोन बोटीवरील १५ खलाशांना सुखरुप करंजा येथे आणून त्यांचा जीव वाचवला असल्याने तो त्या १५ खलासांचा देवदूत ठरला आहे

नुकत्याच निर्माण झालेल्या चक्रीवादळाने रायगड मधील मच्छीमारीसाठी गेलेल्या अनेक मच्छीमारी बोटींचा संपर्क तुटला होता. त्यात करंजा येथील मच्छिंद्र नाखवा मालकाच्या महागौरी नमो ज्ञानेश्वरी या दोन बोटींचाही संपर्क तुटला होता. सदर बोटींचौ वायरलेस यंत्रणा जीपीएस यंत्रणा देखील बंद होती. त्या बोटींचे काय झाले, त्या बोटींवर १५ खलाशी आणि तांडेल कुठे आहेत, तेे कोणालाच ठाऊक नव्हते. बोट मालक मच्छिंद्र नाखवा याने अनेक प्रयत्न केले, कोस्टगार्डकडे देखील तक्रार दाखल करण्यात आली होती. कोणताही सुगावा लागत नव्हता, फक्त मुंबई पासून ८ तास आतमध्ये त्यांचे एकदा लोकेशन मिळाले होते.

त्यानुसार बोट मालक मच्छिंद्र नाखवा याने करंजा येथील युवक अतिश सदानंद कोळी यांना या बोटीचा शोध घ्ोण्यास पाचारण केले. समुद्र खवळलेला असताना आपल्या जीवाची परवा न करता अतिश कोळी यांच्यासह भानुदास कोळी, बोट मॅनेजर आणि तांडेल असे चौघ्ो जण २७ ऑक्टोबर रोजी उरणच्या करंजा येथून बचावासाठी निघाले. बोटीवरील जीपीएस बंद पडलेला असल्याने मोबाईलच्या जीपीएसच्या सहाय्याने अतिश आणि त्याचे साथीदार जवळपास ८ तासांनी जीपीएस लोकेशनच्या ठिकाणी बोट घ्ोऊन पोहोचले. परंतु, सदर ठिकाणी कोणत्याही बोटी आढळून आल्या नाहीत. शोध घ्ोत असताना रात्रीच निघण्याचा साथीदारांच्या मनात आले होते. मात्र, अतिशने आपण सकाळी शोध घ्ोऊ असे सांगून बोट त्याच ठिकाणी नांगरुन ठेवण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी बोटीचा शोध घ्ोण्याचा प्रयत्न केला असता जवळपास ८ ते १० किलोमीटर अंतरावर बोटी दिसून आल्या. मात्र, परिस्थिती पाहता दोन्ही बोटी नादुरुस्त झालेल्या होत्या. एका बोटीचे गेर तुटले होते तर दुसऱ्या बोटीच्या पंपाचे काम निघाला होते. त्यामुळे त्याच ठिकाणी बोटी वादळामध्ये एकमेकांना बांधून नांगरुन ठेवल्या होत्या.

या दोन्ही बोटीवरील राजू सिंग, मनोज सरण, पंकज यादव, राजू गौतम, जगदीश, संतोष कुमार आणि आणखी ९ खलाशी ४ दिवस कोणतेही अन्न न शिजवता फक्त बिस्किट आणि पाण्यावर होते. खूप घाबरलेले आणि आजारी अवस्थेत असलेले खलाशी आपला जीव मुठीत धरुन होते. आणि लगेचच कोणीतरी आपला जीव वाचविण्यासाठी देवदूत आला असल्याने ते बिनधास्त झाले.

अतिश आणि त्याच्या साथीदाराने बंद पडलेल्या या दोन्ही बोटीं त्यांनी नेलेल्या बोटीला दोरीच्या सहाय्याने बांधून परतीच्या प्रवासाला सुरवात केली. वादळामध्ये दोन्ही बोटी एकमेकांना बांधून आणणे खूप अवघड होते. आणतेवेळी अनेक अडचणी आल्या, दोरही तुटले होते. या सर्व अडचणींीवर मात करुन २४ तास प्रवास करीत १५ खलाशी आणि दोन्ही बोटी घ्ोऊन करंजा बंदरात दाखल झाल्या. त्या १५ खलाशांचा जीव वाजवणारा अतिश देवदूत ठरला.

समुद्र खवळलेला होता. परंतु, १५ खलाशांचे जीव आपल्याकडून वाचत असतील, तर आपण गेले पाहिजे असा मनात आल्यावर आम्ही ४ जण बोट घ्ोऊन निघालो. आम्हाला सकाळी बोटी मिळाल्यावर खलाशी खूप घाबरलेले होते. ४ दिवस वादळात असल्याने त्यांच्या पोटात काहीच अन्न नव्हते. ते फक्त बिस्कीट आणि पाण्यावर होते. परतीला आम्हाला वादळ मोठे असल्याने बोटी आणताना २४ तास प्रवास करावा लागला. त्यातही खूप अडचणी आल्या. अखेर आम्ही करंजाला पोहोचल्यावर मनाला एक समाधान मिळाले.
-अतिश कोळी, मच्छीमार, करंजा.

आमच्या बोटी बिघडल्याने आम्ही ४ दिवस वादळात बोटी नांगरुन होतो. कधीही बोटी बुडण्याची भिती वाटत होती. कोणीतरी वाचवयला देवदूत येईल, असे वाटत होते. आणि आतिशच्या रुपाने एक देवदूतच आला आणि आम्हाला सुखरूप घ्ोऊनही आला. खरेच तो देवदूतच आहे.
- संतोष कुमार, बोटीवरील खलाशी. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 मच्छीमारांना मोंथा चक्रीवादळाचा फटका