नेरुळ-उरण लोकल १२ डब्यांची करा, लोकलच्या फेऱ्या वाढवा

पनवेल ः उरण परिसरातील प्रवाशांना दररोज भेडसावणाऱ्या गर्दीच्या आणि असुविधेच्या पार्श्वभूमीवर नेरुळ-उरण लोकल ट्रेन ९ डब्यांऐवजी १२ डब्यांची करण्यात यावी. तसेच या मार्गावरील फेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी करणारे स्मरणपत्र ३० ऑक्टोबर रोजी ‘मध्य रेल्वे'चे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना देण्यात आले. यासाठी पनवेल महापालिव्ोÀचे माजी विरोधी पक्षनेते तथा भाजप नेते प्रितम म्हात्रे यांनी पाठपुरावा केला आहे

या अगोदरही २७ नोव्हेंबर २०२४ रोजी याच विषयावर लेखी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर सदर विषयात रेल्वे प्रशासनाच्या सकारात्मक बैठका झाल्या. मात्र, अद्याप त्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने सदर मागणी पुन्हा करण्यात आली आहे. दररोज प्रवास करणारे शाळकरी विद्यार्थी, महिला आणि नोकरदार वर्ग यांना गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. वाढत्या प्रवासी संख्येमुळे सध्या धावणाऱ्या ९ डब्यांच्या लोकल अपुऱ्या पडत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या आणि सोयीच्या दृष्टीने सदरची मागणी अत्यंत तातडीची असल्याचे स्मरणपत्रात नमूद करण्यात आले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

१५ खलाशांना वाचवणारा करंजातील युवक ठरला देवदूत