देशाची एकता आणि अखंडतेचा संदेश प्रसारित करत नवी मुंबईत एकता दौड संपन्न 

नवी मुंबई : भारताचे पहिले उपपंतप्रधान  लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांच्या  जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, नवी मुंबई यांच्या वतीने घणसोली येथे एकता दौडचे (RUN FOR UNITY) आज आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नागरिकांचा  विशेषतः युवा वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. 

राज्याचे वनमंत्री ना. गणेश नाईक यांनी एकता दौडचा शुभारंभ केला. या एकता दौडमध्ये माजी खासदार  संजीव नाईक, भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, माजी नगरसेवक शशिकांत राऊत, घनश्याम मढवी,शंकर मोरे, प्रकाश मोरे, मोहन म्हात्रे, भाजपा युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष निकेतन पाटील, विजय वाळुंज, दिलीप म्हात्रे, चेतन संदीप म्हात्रे, शिरीष पाटील, पुरुषोत्तम भोईर, कृष्णा पाटील, आत्माराम पाटील, रॉबिन मढवी, राजेश मढवी, प्रताप महाडिक सर, सुदर्शन जिरगे, शिवाजी खोपडे, दीपक पाटील, दाजी सणस, सुरेश पाल, चारुदत्त ठाणांबिर, भगवती पगारिया, योगेश पाटील, शरद पाटील, राजेंद्र इंगळे, राहुल इंगळे, रामभाऊ खोपडे, श्याम कोटकर, हर्षाली कोटकर, निर्मला पाटील, एडवोकेट रंजना वानखडे, उर्मिला सुरेश शिंदे, निर्मला पांडे, सुभाष गायकवाड सर,अजिंक्य पाटील सहभागी झाले होते.

"भारत माता की जय" असा जयघोष करीत पाम बीच  रोड घणसोली येथून एकता दौडची सुरुवात झाली. महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या नेतृत्वात विकसित भारताचा संकल्प साकार होतो आहे. वल्लभभाई पटेल यांनी दिलेला एकता आणि अखंडतेचा संदेश  युवकांमध्ये रुजवण्यासाठी  राज्यभर एकता दौडचे  आयोजन करण्यात आल्याची माहिती वनमंत्री नाईक यांनी दिली. भारत सर्वार्थाने प्रगती करत असून हे 'विश्वचि माझे घर' या उक्तीप्रमाणे   जगाचे नेतृत्व देखील करीत असल्याचे वनमंत्री नाईक म्हणाले.  देशाची एकता आणि अखंडतेसाठी वल्लभभाई पटेल यांनी केलेला आग्रह, निग्रह आणि कार्य यामुळेच त्यांना लोहपुरुष ही उपाधी मिळाली. त्यांनी नेहमीच माणुसकी धर्माचा सन्मान केला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नेरुळ-उरण लोकल १२ डब्यांची करा, लोकलच्या फेऱ्या वाढवा