दक्षता जनजागृती सप्ताह अंतर्गत ‘नमुंमपा'मध्ये विशेष कार्यक्रम

नवी मुंबई:  प्रत्येक अधिकारी, कर्मचारी याने आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक राहून काम करणे आणि त्याविषयी कायम सतर्क राहणे गरजेचे आहे. महापालिव्ोÀतील सर्व अधिकारी, कर्मचारी महापालिकेचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. त्यामुळे आपल्या संस्थेची प्रतिमा उंचविण्याची जबाबदारी आपल्यापैकी प्रत्येकाची आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुवत डॉ. व्ौÀलास शिंदे यांनी व्ोÀले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नवी मुंबई युनिट यांच्या वतीने नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे, नवी मुंबई युनिट  उपअधीक्षक धर्मराज सोनके, प्रशासन विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे, आदि उपस्थित होते.

मर्यादा न कळल्यास प्रतिष्ठा धुळीस -एसपी शिवराज पाटील

याप्रसंगी बोलताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांनी १४५ कोटी जनतेमधून आपल्याला सरकारी सेवेची संधी मिळाली आणि या माध्यमातून जनसेवेची संधी उपलब्ध झाली. त्यामुळे आपली जबाबदारी मोठी आहे असे सांगत भ्रष्टाचार कधीही समाधान देऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या मर्यादा आपल्याला कळल्या पाहिजेत; अन्यथा पकडले गेल्यानंतर आपली प्रतिष्ठा धुळीस मिळते, आपले आयुष्य संकटात सापडते. याचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. त्यामुळे आपल्या मर्यादा आणि आपले साध्य लक्षात घ्ोऊन प्रामाणिकपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी व्ोÀले.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांनी देशाचे देणे लागतो या भूमिकेतून काम करण्याचे ठरवून आपण सरकारी सेवेत येतो. त्यामुळे येथे कोणत्याही आमिषाला बळी न पडता प्रामाणिकपणे काम करणे सर्वांच्याच हिताचे असल्याचे मत व्यक्त केले.

२७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सर्वत्र ‘दक्षता जनजागृती सप्ताह' साजरा करण्यात येत असून ‘दक्षता आपली सामायिक जबाबदारी या संकल्पनेनुसार विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका मुख्यालयात आयोजित जनजागृतीपर विशेष कार्यक्रमाप्रसंगी महापालिका अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

या सप्ताह निमित्त महानगरपालिका मुख्यालयासह इतर विभाग कार्यालये आणि इतरही कार्यालयांमध्ये ‘दक्षता सप्ताह'निमित्त जनजागृतीसाठी माहितीप्रद फलक प्रदर्शित करण्यात आले आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईतील जनता दरबारात 404 निवेदने सादर