नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा
‘वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प स्वयं अध्ययन परीक्षा'चा बक्षीस वितरण समारंभ संपन्न
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, रबाळे शाखा तर्फे आयोजन
ऐरोली : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, रबाळे शाखा तर्फे वाचन प्रेरणा दिन निमित्त आयोजित ‘वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प स्वयं अध्ययन परीक्षा'चा बक्षीस वितरण समारंभ २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता रबाळे येथील राजषार्ी शाहू महाराज विद्यालय मध्ये आयोजित करण्यात आला होता.
या समारंभात परीक्षा मधील सर्व विजेत्या १० गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींना अंनिस तर्फे ‘वयात येताना' या पुस्तकाची भेट आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या परीक्षा मध्ये पाचवी ते आठवी गटात ५० आणि नववी ते बारावी गटात ५० असे १०० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते
अंनिस या संघटनेच्या कार्यप्रणालीवर आधारीत प्रश्न पत्रिका विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी देण्यात आली होती. विद्यार्थ्यानी ती आई- वडील, भाऊ-बहिण आणि मित्र यांच्याशी चर्चा करुन प्रश्न पत्रिका सोडवून आणली. या परीक्षेचे बक्षीस वितरण ‘राजषार्ी शाहू महाराज विद्यालय'चे मुख्याध्यापक अमोल खरसंबले, जेष्ठ शिक्षिका अर्चना म्हात्रे, कल्पना नाफडे, शिक्षक अविनाश जाधव, अमोलकुमार वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.
मुले-मुलींमध्ये वैज्ञानिक जाणिवा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी ‘महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती' तर्फे ‘वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प स्वयं अध्ययन परीक्षा' घेतली जाते. महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींना या परीक्षेत सहभागी करुन घेऊन अंनिस संघटनेची माहिती या माध्यमातून घराघरात पोहोचवून जनजागृती करणे, हाच या परीक्षा घेण्यामागचा हेतू आहे, असे कार्यक्रम संयोजक ‘अंनिस'चे रबाळे शाखा कार्याध्यक्ष तथा शिक्षक अविनाश जाधव यांनी सांगितले.