नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा
लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगांशी संबंधित व्यावसायिकांसाठी ठाण्यातील ११ व १२ नोव्हेंबर रोजी बिझनेस जत्रा या मेळावा
ठाण्यात ११ व १२ नोव्हेंबर रोजी 'बिजनेस जत्रा २०२२' चे आयोजन
ठाणे : लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगांशी संबंधित व्यावसायिकांसाठी ठाण्यातील टीपटॉप प्लाझा येथे येत्या दिनांक ११ व १२ नोव्हेंबर २०२२ रोजी दोन दिवशीय बिझनेस जत्रा या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्रालय, राज्य शासनाचे औद्योगिक विकास महामंडळ, खादी ग्रामोद्योग, एनआयएससी, ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने लक्षवेध संस्थेच्या वतीने व ॲडमार्क मल्टीवेंचरच्या (ठाणेकर कॅम्पेन पार्टनर ) सहयोगाने बिजनेस जत्रा या व्यावसायिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा दिनांक ११ व १२ नोव्हेंबर २०२२ रोजी टीप टॉप प्लाझा, ठाणे(प) येथे सकाळी १०.३० वाजता ते संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. ह्या मेळाव्याचे यंदाचे २ रे वर्ष असून दहा हजारहून अधिक विविध क्षेत्रातील व्यवसायिक २ दिवसात भेट देणार आहेत. या मेळाव्यादरम्यान लघुउद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी नामवंत आणि यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शनदेखील आयोजित करण्यात आले आहे.तसेच प्रदर्शन पण असणार आहे.
या जत्रेमध्ये १२५ पेक्षा अधिक स्टॉल्स असणार आहेत. वेगवेगळ्या उद्योगांशी संलग्न संस्था आणि तज्ज्ञ व अनुभवी व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग विकास विभागाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, तसेच उद्योगमंत्री उदय सामंत, ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार डॉ .श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के, आमदार प्रसाद लाड आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे संचालक विपिन शर्मा, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्यासह केंद्र सरकार, राज्य सरकार सर्व उद्योग मंत्रालयातील अधिकारी आणि प्रतिनिधी तसेच ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी यांचे या कार्यक्रमाला सहकार्य आहे.
उद्योजक होऊ इच्छित असणारे विद्यार्थी, उद्योजक आणि सर्व नागरिकांनी या जत्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.