वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
मनसे, ‘महाविकास आघाडी'तर्फे मुंबईत ‘सत्याचा मोर्चा'
मुंबई: विधानसभा निवडणुकीनंतर जे प्रकार समोर आले, ते पाहता ‘संसदीय लोकशाही'ला धक्का बसला आहे. ‘लोकशाही'साठी आपल्याला एक व्हावे लागेल. आपण सध्या जी मतचोरी सुरु आहे ती थांबवूया. सगळेजण एक होऊया, असे ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष'चे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सांगितले.
मनसे आणि ‘महाविकास आघाडी'च्या वतीने १ नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये ‘निवडणूक आयोग'विरोधात ‘सत्याचा मोर्चा'चे आयोजन करण्यात आले होते. या ‘मोर्चा'वेळी मार्गदर्शन करताना खा. शरद पवार बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री ‘शिवसेना उबाठा' पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, ‘शेकाप'चे जयंत पाटील, ‘राष्ट्रवादी'चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, विधान परिषद काँग्रेस गटनेते सतेज पाटील, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नसीम खान, आ. भाई जगताप, रमेश बागवे, ‘माकप'चे डॉ. अजित नवले, ‘भाकप'चे प्रकाश रेड्डी, खा. सुप्रिया सुळे, खा. अनिल देसाई, खा. अरविंद सावंत, आ. आदित्य ठाकरे,
शरद पवार म्हणाले की, आजचा मोर्चा जुन्या गोष्टींची आठवण करुन देत आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यासाठी मोर्चे निघाले होते. काळाघोडा आणि त्या परिसरात आंदोलन पार पाडले. आज तुम्ही जशी एकजूट दाखवली. त्यावेळी देखील अशीच एकजूट पाहिला मिळाली होती. ‘लोकशाही'मध्ये ‘संविधान'ने जे अधिकार दिले आहेत, त्यानुसार आपण लढत आहोत. विधानसभा निवडणुकीनंतर जे प्रकार समोर आले, त्यावेळी ‘संसदीय लोकशाही'ला धक्का बसल्याचे समोर आले. उत्तमराव जानकर यांनी काही बाबी सांगितल्या. सत्तेचा गैरवापर कसा केला जातो, ते देखील सांगितले. राजकीय मतभेद असू शकतात. परंतु, आता ते विसरून आपल्याला एक व्हावे लागेल. लोकशाहीत आपण मताचा अधिकार जतन केला पाहिजे, असे खा. पवार म्हणाले.
शरद पवार पुढे म्हणाले की, काही ठिकाणी तक्रारी झाल्या. बनावट आधारकार्ड केले जात आहेत. ते म्हणाले पुरावे दाखवा. आरोप सिध्द करणारा डेमो ज्या व्यक्तीने दाखवला, त्याच्यावरच आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जे पुरावे देतात, त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. आज आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी विचारधारा वेगळी असली तरी अनेक पक्ष सहभागी झाले आहेत. ‘लोकशाही'साठी आपल्याला एक व्हावे लागेल. आपण सध्या जी मतचोरी सुरु आहे ती थांबवूया. सगळेजण एक होऊया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मतदार याद्या साफ करा -राज ठाकरे
सगळे बोलत आहेत दुबार मतदार आहेत. आम्ही बोलतोय, ‘भाजपा'चे  लोक  बोलताय, अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी'मधील लोक बोलताय. मग निवडणुका घ्यायची घाई का?, असा सवाल ‘सत्याचा मोर्चा'मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. मतदार याद्या साफ करा, पारदर्शक याद्या केल्यावर यश-अपयश कोणाचे, ते स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. यावेळी राज ठाकरे यांनी सभेत दुबार मतदारांचा पुरावा देखील दिला. आज मी इकडे पुरावा घ्ोऊन आलो आहे. दुबार मतदारांना घ्ोऊन आलोय, असे म्हणत राज ठाकरे यांनी दुबार मतदारांच्या याद्यांच्या कागदपत्रांचा डोंगर दाखवला. जेव्हा कधी निवडणुका होतील, तेव्हा याद्यांवर काम करा. प्रत्येक चेहरा समजायला पाहिजे. दुबार-तिबार तिथे आले, तर तिथेच फोडून काढा आणि मग पोलिसांच्या ताब्यात द्या, असा सूचना देखील राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदारांनेही जागे झाले पाहिजे- उध्दव ठाकरे
मतदान चोरीच्या विरोधात आम्ही सगळे एकत्र येऊन लढा देतोयच; पण आता लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदारांनेही जागे झाले पाहिजे. त्यामुळे मतचोर ज्या ठिकाणी दिसेल, त्या ठिकाणी त्याला फटकवा, असे आदेशच उध्दव ठाकरे यांनी यावेळी दिले. बोगस आणि दुबार मतदारांचे सगळे पुरावे घ्ोऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत. आता न्यायालयाकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले. मनसे आणि ‘महाविकास आघाडी'कडून मुंबईत ‘निवडणूक आयोग'च्या मतदार यादीतील भ्रष्टाचाराविरोधात सत्याचा मोर्चा काढण्यात आला असून आता लोकांनी जागृत रहावे, असे आवाहन उध्दव ठाकरे यांनी यावेळी व्ोÀले.
आम्ही लोकशाही मार्गाने यांना ठोकण्यासाठी तयार आहोतच; पण आता जनतेनेही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आले पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर लोकशाहीचा खून होत आहे. त्यामुळे जे काही चालले आहे थांबवले पाहिजे, असे उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
‘निवडणूक आयोग'चे उत्तर इतिहासातील सर्वात बोगस उत्तर -थोरात
देशातील निवडणुकीमध्ये मतचोरी झालेली आहे, ते ‘लोकसभा'चे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह उघड करुन दाखवले. पण, ‘वेंÀद्रीय निवडणूक आयोग'ने त्यावर थातूर-मातूर उत्तर दिले. ‘निवडणूक आयोग'चे उत्तर इतिहासातील सर्वात बोगस उत्तर आहे. विधानसभा निवडणुकीत बोगस मतदारयाद्या वापरण्यात आल्या, त्यासंदर्भात काँग्रेस पक्ष आणि ‘मविआ'तील सर्व घट पक्षांनी ‘निवडणूक आयोग'ला विचारणा करुन बोगस याद्या वापरु नका, असे सांगितले. पण, विधानसभेच्या बोगस याद्यांवर आणि त्यावर घ्ोण्यात आलेल्या हरकतींवर कोणताही निर्णय घ्ोतला नाही. आता तीच बोगस यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जात आहे. त्यामुळे आम्ही सर्व विरोधी पक्ष त्या बोगस याद्यांविरोधात आहोत, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यावेळी बोलताना सांगितले.
तर आमचा ‘सत्याचा मोर्चा' निघत असताना सत्ताधाऱ्यांनी मूक मोर्चा काढला आहे. या ‘मूक मोर्चा'मध्ये ‘निवडणूक आयोग'ही सहभागी झाला आहे का? अशी शंका थोरात यांनी यावेळी व्यवत व्ोÀली.