वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
उपवनमध्ये ५१ फुटी विठ्ठल मूर्तीचे अनावरण
ठाणे: (उपवन तलाव) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटावर साकारलेल्या ५१ फुटी भव्य श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या मूर्तीमुळे उपवन परिसर पवित्र झाला असून 'ठाणे' शहराला 'प्रति पंढरी' चे रूप प्राप्त झाले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री असताना वारकऱ्यांसाठी घेतलेल्या विमा, अनुदान आणि दिंड्या टोल फ्री करण्याच्या निर्णयांची माहिती शिंदे यांनी दिली. ही मूर्ती उभारण्याची विनंती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली होती, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. यानंतर निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन झाले.