वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
७० वर्षीय नराधमाचा १० वर्षीय बालिकेवर २ वर्षे लैंगिक अत्याचार
धक्कादायक! नवी मुंबई हादरली!
पनवेल: संपूर्ण नवी मुंबईला हादरवून सोडणारी अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक घटना पनवेल-तळोजा परिसरात उघडकीस आली आहे. लंडनमध्ये राहणाऱ्या ७० वर्षीय वृध्दाने भारतात येऊन अवघ्या १०वर्षांच्या अल्पवयीन बालिकेवर तब्बल २ वर्षांपासून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या घटनेतील सर्वात धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे, या संपूर्ण अत्याचाराच्या प्रकरणात सदर चिमुरडीची जन्मदात्री आईच आरोपीला सक्रियपणे मदत करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने केलेल्या तपासात पैशांच्या लालसेपोटी माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी या नराधम आरोपीसह पीडित बालिकेच्या निर्दयी आईलाही अटक केली आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ७० वर्षीय वृध्दाचे नाव फारुक अल्लाउद्दीन शेख असे असून तो मुळचा पाँडेचेरी येथील रहिवाशी आहे. मात्र, सध्या तो लंडन येथे कुटुंबासह स्थाईक आहे. आरोपी फारुक शेख याने २ वर्षापूर्वी तळोजा, सेक्टर-२० मध्ये पलॅट विकत घ्ोतला होता. या पलॅटवर तो २-३ महिन्यातून एकदा लंडन येथून २-३ दिवसासाठी येत होता. यादरम्यान पीडित मुलीच्या आईसोबत त्याची घरकामाच्या निमित्ताने ओळख झाली होती. आरोपी फारुक शेख लंडन येथून तळोजा येथे आल्यास पीडित मुलीची आई आपल्या १० वर्षाच्या मुलीला त्याच्या घरी खेळण्याच्या बहाण्याने सोडून निघून जात होती.
यादरम्यान आरोपी पीडित मुलीला मद्य पाजून तिच्यावर लैंगिक अमानुषपणे अत्याचार करत होता. जर तिने कोणाला सांगितले, तर जीवे मारण्याची धमकी देऊन तिला गप्प बसवत होता. गेल्या २ वर्षांपासून सदर प्रकार सुरु होता. काही दिवसापूर्वी आरोपी फारुक शेख लंडन येथून तळोजा येथे आपल्या पलॅटवर आला होता. त्यानंतर त्याने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली होती. याबाबातची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, निलम पवार, सरिता गुडे, आदिंच्या पथकाने ३० ऑवटोबर रोजी सकाळी या नराधमाच्या पलॅटवर छापा मारला. त्यानंतर आरोपी फारुक शेख याला ताब्यात घ्ोऊन मारुन पीडित मुलीची सुटका केली.
दरम्यान, या आरोपीच्या पलॅटच्या तपासणीत दारुची बॉटल, सेक्स पॉवरच्या गोळ्यांची पाकिटे, सेक्स टॉय, व्हॉब्रेटर, व्हॅसलीन, डिजीटल व्हिडीओ रेकॉर्डर, डिव्हीआर अशा अनेक संशयास्पद वस्तू आढळून आल्या असून पोलिसांनी या सर्व वस्तू जप्त केल्या आहेत.
अडीच लाख, रेशनसाठी आईनेच विकले...
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष आणि तळोजा पोलिसांनी पीडित मुलीच्या आईकडे चौकशी केली असता, त्यांनाही धक्का बसला. पीडित मुलीच्या आईने आरोपी फारुक शेख याच्याकडून घर भाड्याने घ्ोण्यासाठी २.५० लाख रुपये घ्ोतले होते. त्याचप्रमाणे दर महिन्याचे रेशन (धान्य) देखील फारुककडून मिळणाऱ्या रवकमेतूनच ती खरेदी करत होती. या पैशांसाठी ती आपल्या १० वर्षाच्या मुलीला वारंवार फारुकच्या घरी पाठवत असल्याचे तपासात उघड झाले आहे. आपल्या मुलीवर ७० वर्षाच्या व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार होत असल्याची माहिती असूनही केवळ पैशांच्या मोहापायी निर्दयी आईने सदर घृणास्पद कृत्य सुरु ठेवल्याचे तिच्या चौकशीत उघड झाले आहे. पैशांची लालसा आणि मायेची किंमत न करणाऱ्या जन्मदात्रीच्या या कृत्याने पोलीस अधिकारीही स्तब्ध झाले आहेत.  
पोलिसांची तत्पर कारवाई...
या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घ्ोऊन तळोजा पोलीस ठाण्यात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी फारुक अल्लाउद्दीन शेख आणि त्याला साथ देणारी पीडित मुलीची जन्मदात्री आई या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पनवेल-तळोजा परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.