कॉसमॉस : देखणं..पण उपद्रवी फुल रोपटं

काँंग्रेस गवत ह्या गवतवर्गिय उपद्रवी वनस्पतीचं पन्नास वर्षांनी का होईना उच्चाटन केलंं गेलं. पण इतरही तण किंवा कॉसमॉससारखी झुडपं वाढून  गवत जे गाईगुरांना उपयुक्त, पौष्टिक असं चार, पाच महिने मुबलक मिळत असे त्यावरच संक्रांत यायला लागली.

    कोथरूडची लोकवस्ती संपली किंवा इतरही ग्रामीण भाग सोडून जसजसं पुढे जावं तसतसं शेंदरी, पिवळसर अतिशय देखणी फुले दिसायला लागतात. पहिल्यांदा रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी ही कॉसमॉसची फुलांनी बहरलेली झुडपं लोकांना मोहवून टाकायची. कोणी पेंटींग काढ.  कोणी कौतुकाने फोटो काढ असं चालत असे. कात्रजचा भाग असो किंवा सूस वगैरे जिकडे तिकडे गवताळ जागा व्यापलेली व गवताला ज्याची गाई, गुरांना अतिशय गरज आहे आणि गवत गरजेनुसार मिळत असल्यामुळे  शेतकऱ्यांचे दुग्ध उत्पादनपण ह्या दिवसांत वाढत असल्याने गवताचं ऊच्चाटन करून पुढे, पुढे पसरत जात असलेली देखण्या फुलांची वनस्पती नष्ट करणं गरजेचं वाटू लागलं.

 हीच रोपटी, ज्यांची पशुधनाला अजिबात खाद्य म्हणून उपयोग नाही अशी मोकळी रानं जिथे गरिबीने गांजलेल्या शेतकऱ्यांच्या गाई, म्हशींना चार, पाच महिने हिरवंगार गवत खायला मिळत असे ज्याने चार, पाच महिने का होईना शेतकऱ्यांचे पैसे वाचत होते त्यावरच ह्यांच्या उगवण्याने गदा येऊ लागली. कारण ही परदेशी झुडपं ( मेक्सिको ) जिथे जागा मिळेल तिथे पसरायला लागली. आणि त्यामुळे गवत जे गाईगुरांना पावसाळ्यात उपयुक्त खाणं मिळत होतं..त्याची जागा आक्रसायला लागली, कमी कमी व्हायला लागली. हळूहळू गवत उगवणं पुर्णपणे बंद होईल. शेतकरी बांधवांसाठी त्यांच्या पशूधनासाठी ही आणि अशा तऱ्हेने  उगवणारे तण, झुडपं ही बीज पडण्या अगोदर नष्ट करणेच सर्वांच्या हिताचे आहे.  - कल्पना किनरे - तेंडुलकर सौ. देवयानी चारोळकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

ए. आय. गुन्हेगारी वाढते आहे !