वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
मनसे तर्फे वाशी स्थानकाबाहेर "सत्याचा मोर्चा"ची पत्रके वाटून मतदारांमध्ये जनजागृती
नवी मुंबई : मतदार यादीच्या घोळा विरुद्ध मनसे व इतर पक्षांनी १ नोव्हेंबर रोजी सत्याचा मोर्चा काढला आहे. खऱ्या मतदारांनी मोर्चाला यावे असे आवाहन करत २९ ऑक्टोबर रोजी सकाळी मनसेने वाशी रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांना मनसेने पत्रके वाटली. खोट्या मतदारांविरुद्ध खऱ्या मतदारांनी मोर्चाला यावे, असे आवाहन मनसे प्रवक्ते व शहरअध्यक्ष गजानन काळे आणि मनसे कार्यकर्त्यांनी प्रवाशांना केले.
यावेळी मनसे प्रवक्ते व शहरअध्यक्ष गजानन काळे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, महिला सेना शहरअध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, उपशहरअध्यक्ष अनिथा नायडू, विद्यार्थी सेना शहरअध्यक्ष संदेश डोंगरे, रोजगार शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना शहरअध्यक्ष अनिकेत पाटील, मनसे विभाग अध्यक्ष अभिलेश दंडवते, सागर विचारे, अक्षय भोसले, योगेश शेटे, विकास पाटील, विभाग सचिव संदेश खांबे, उपविभागअध्यक्ष संजय शिर्के, शैलेश पांजगे, शशी गायकवाड, जयेश चोपडे, यशोदा खेडसकर, संगीता वंजारी यांच्यासह अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.