अक्कादेवी धरण ओव्हरफ्लो

उरण : विश्रांती घेतलेल्या पावसाने सुरुवात केल्याने निसर्गाच्या कुशीत डोंगरदऱ्यात असणारे अक्कादेवी धरण भरुन वाहू लागले आहे. त्यामुळे पर्यटकांना सुरक्षितपुणे या ठिकाणी आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे.

उरण तालुक्यातील ऐतिहासिक चिरनेर गांव येथे असणारे निसर्गरम्य अक्कादेवी धरण पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. वर्षासहलीसाठी दर रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत. अक्कादेवी धरणाजवळ आदिवासी वाडी आहे. शहरी पर्यटकांना डोंगर खोऱ्यातील आदिवासींचे जीवन कसे असते, याचे यथार्थ दर्शन येथे घडत आहे. निसर्गरम्य परिसर आणि धरणातून पडणारे पाणी याचा सुयोग्य मेळ या ठिकाणी गेल्यानंतर सहाजिकच अनुभवास येत असल्यामुळे धोकाविरहित सदर धरण आहे.

चिरनेर गावाजवळ अवकादेवी धरण असल्याने या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना गावातील व्यावसायिक, चायनीज फुड प्रमाणे खाद्य पदार्थ देखील सहज उपलब्ध होत आहेत. धरण क्षेत्राच्या अगदी मध्यभागी दगडी बांधिव विहीर असून, या धरणाचा परिसर अत्यंत विलोभनीय आणि सुखावणारा आहे. ऐतिहासिक आणि तीर्थक्षेत्राचा वारसा लाभलेल्या चिरनेर गावात पर्यटक आल्यानंतर ते प्रथम येथील श्री महागणपतीचे दर्शन घेतात. तसेच स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करुन अक्कादेवी धरण गाठतात, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुरेश केली यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 पनवेल महापालिकेच्या सर्व वैद्यकिय अधिकाऱ्यांचा सत्कार