पनवेल महापालिकेची प्लास्टिक विरोधात कारवाई

पनवेल : आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानसार पनवेल महापालिकेच्या पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर या प्रभागांमध्ये प्लास्टिक विरोधी कारवाई करण्यात आली. यामध्ये १ टन सिंगल युज प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच सुमारे ५५ हजाराची दंड वसुलीही करण्यात आला.

पनवेल महापालिका क्षेत्रात एकल वापर (सिंगल युज) प्लास्टिकवर प्रतिबंध आहे. उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या सुचनेनुसार प्रतिबंधित प्लास्टिकची साठवणूक, विक्री आणि वापर करणाऱ्यांवर महापालिकेच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येत आहे.

खारघर प्रभाग समिती अ-मध्ये प्लास्टिक पिशवी बंदी कारवाई सुमारे ६४० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. सदर कारवाईवेळी आरोग्य निरीक्षक जितेंद्र मढवी, स्वच्छता निरीक्षक अतुल मोहोकर, संदीप भोईर, अजय ठाकूर, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि स्वच्छता दूत उपस्थित होते.

प्रभाग समिती ब अंतर्गत  प्रभाग क्रमांक ८ मध्ये आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे, स्वच्छता निरीक्षक अमोल कांबळे, हरेश कांबळे, अमित जाधव, दिग्नेश भोईर यांच्या पथकाने ९५ किलो प्लास्टिकजप्त केले. क आणि ड-प्रभाग समिती मध्ये महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, स्वच्छता निरीक्षक योगेश कस्तुरे, त्रषिकेश गायकवाड, अतुल वास्कर, महेंद्र भोईर, धनश्री पीवाल आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने कारवाई करुन सुमारे २६५ किलो प्लास्टिक जप्त केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 उरण बाजारात करांदा फोडींना वाढती मागणी