बेलापूर मध्ये वैद्यकीय महाविद्यालय उभारणीच्या हालचालींना वेग

वाशी : नवी मुंबई महापालिका तर्फे बेलापूर येथे ५००  खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कम पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल कॉलेज उभारण्यात येणार असून, त्यासाठी  अंदाजे  ८५०  कोटी रुपये खर्च येणार आहे. याकरिता आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे अनेक अडचणी पार करत आता या मेडिकल कॉलेज उभारणी करीता महापालिका एका खाजगी वास्तू विशारदाची नेमणूक करणार असून, त्यासाठी निविदा प्रकिया राबवण्यात आली आहे.

नवी मुंबई शहरातील खाजगी रुग्णालयांच्या आवाजही दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांना खाजगी रुग्णालयात उपचार घेणे परवडत नाही. त्यामुळे नवी मुंबई शहरातील नागरिकांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहावे, याकरिता आमदार सौ. मंदाताई  म्हात्रे यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यानंतर  सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कम पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल कॉलेज बांधण्याकरीता सिडको तर्फे बेलापूर सेक्टर-१५ ए मधील ७.६ एकर क्षेत्रफळाचा भूखंड नवी मुंबई महापालिकेला देण्यात आला. सदर भूखंड ‘सिडको'ने वितरीत केल्यानंतर बेलापूर येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कम पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल कॉलेज उभारणीच्या कामात अनेकांनी राजकीय खो घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेक अडचणींवर मात करत सदर जागेवर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कम पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल कॉलेज इमारत उभी राहणार आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कम पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल कॉलेज इमारत तळ मजला  अधिक सात मजले अशी असणार आहे.या इमारतीत ५०० खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पदव्युत्तर आणि नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शाखा, प्राध्यापकांसाठी निवास व्यवस्था, विद्यार्थी वसतिगृहे,  ४०० वाहनांची क्षमता असलेले वाहन तळ  यांचा समावेश आहे.

बेलापूर येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कम पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी नवी मुंबई महापालिका एका खाजगी वास्तू विशारदाची नेमणूक करणार असून, त्याकरिता वास्तुविशारद  स्वारस्य अभिव्यक्ती निविदा प्रकिया राबवण्यात आली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डीपीएस फ्लेमिंगो तलाव मनपाला हस्तांतरित करा –आ. गणेश नाईक