तुर्भे नाका येथे आप नवी मुंबईची रॅली

तुर्भे : रविवार दिनांक १२ जून रोजी, तुर्भे नाका-वॉर्ड पॅनल १४ चे अध्यक्ष आणि आप नवी मुंबईचे युवा नेते, सुनील जाधव ह्यांच्या प्रभागा मध्ये टीम आप नवी मुंबई तर्फे जनसंपर्क अभियान आणि येणाऱ्या न मु मी पा निवडणुकीच्या प्रचाराच्या उद्देशाने, रॅली आयोजित करण्यात आली होती. ह्या प्रसंगी आप नवी मुंबई कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

या रॅली दरम्यान टीम आप नवी मुंबई तर्फे, देशभक्तीपूर्ण घोषणा, तसेच आपच्या दिल्लीतील अती उत्कृष्ट जनताभिमुख कामाचा प्रसार करण्याच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच अध्यक्ष सुनील जाधव ह्याच्या समाजकार्य तसेच आप पक्षाची ध्येयय धोरणे ह्यांचा प्रसार करणारी माहिती पत्रके वाटण्यात आली. हि रॅली, नित्यानंद हॉटेल तुर्भे नका येथून चालू होऊन, हनुमान नगर, आंबेडकर नगर, गणेश नगर, इंदिरा नगर इत्यादी भागातील अंतर्गत गल्ली बोळात फिरविण्यात आली. ह्या रॅली मध्ये सुनील जाधव ह्यांच्या समर्थनार्थ, आप नवी मुंबईच्या कार्यकारिणीतील, मुख्य ट्रेड युनियन समन्वयक देवराम सूर्यवंशी, मुख्य मागासवर्गीय समन्वयक महेंद्र कणसे, घणसोली नोड अध्यक्ष सविता कणसे, कोपऱखेरने वॉर्ड अध्यक्ष राहुल मेहरोलिया आणि धनवंती बच्चन, घणसोली वॉर्ड अध्यक्ष दत्ता संकपाळ, नेरुळ वॉर्ड अध्यक्ष आणि युवा नेते चिन्मय गोडे ह्यांच्यासह अनेक स्थानिक कार्यकर्त्यांचा समावेश होता.

रॅलीच्याच्या बंदोबस्तासाठी, पोलीस खात्याने केलेल्या सहकार्यासाठी आप नवी मुंबई अध्यक्ष श्यामभाऊ कदम ह्यांनी आभार प्रदर्शन केले.

Read Previous

पालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणी

Read Next

अमृत पाटील यांना काव्य गौरव पुरस्कार